मंडणगडात अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंडणगडात अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Published on

मंडणगडात १८६० जणांची तपासणी
‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’; १०२ जण अवयवदान करणार
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २५ ः मंडणगड पंचायत समिती, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातर्फे तालुक्यात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानास सुरुवात झाली. तालुक्यातील एकूण १८६० लाभार्थींनी शिबिराचा लाभ घेतला. यात १११८ स्त्रिया, ७४२ पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात १५० ईसीजी आणि रक्ततपासणी ९४२ तसेच कॅन्सर तपासणी करण्यात आली. १०२० आयुष्मान कार्ड काढण्यात आली. ५१५ जणांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. १०२ जणांची अवयवदान करण्यासाठी शपथपत्र घेण्यात आली.
हे अभियान २ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. राजमाता जिजाऊ सभागृहात महिला अधिकारी व शहरातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर झाले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे, गटविकास अधिकारी सुनील खरात, गटशिक्षणाधिकारी कल्याणी मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी, कर्मचारी या अभियानासाठी मेहनत घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com