चार तालुक्यात १२० गावांमध्ये बिबट्यांचा वावर
-rat२५p२४.jpg-
२५N९४१५३
रत्नागिरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याचे दर्शन होत आहे.
------
(टीप- देवीच्या फोटोच्या शेजारी घ्यावी.)
जिल्ह्यातील १२० गावांमध्ये बिबट्यांचा वावर
संख्या वाढली; मानवीवस्तीजवळ वावर, १९ महिन्यांत २१ बिबट्या मृत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांमध्ये बिबट्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अधिवास धोक्यात आल्यामुळे बिबट्यांचा मानवीवस्तीजवळील आढळ अधिक आहे. रत्नागिरी वनविभागातील ४ तालुक्यांमधील १२० गावांत बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. मागील १९ महिन्यांत ४ तालुक्यांमध्ये वनविभागाने रेस्क्यू केलेल्या बिबट्यांपैकी २१ बिबट्यांचा मृत्यू झाला असून, २३ बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले तसेच दोन बछड्यांना सातारा येथील टी. टी. सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.
जिल्ह्याचा विचार करता दक्षिण रत्नागिरीत बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पूर्वी क्वचित बिबट्याचे दर्शन व्हायचे; पण आता रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर या भागात आठवड्यातून २-३ किंबहुना अधिक बिबटे आढळत आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे काम, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड आदी या कारणांमुळे बिबट्या आता मानवीवस्तीत येऊ लागला आहे. पूर्वी बिबट्यांचा वावर इतका नव्हता, तो आता अधिक प्रमाणात वाढला आहे. भक्ष्याच्या शोधात ते मानवीवस्तीत दिसू लागले आहेत. वनविभागाने केलेल्या पाहणीमध्ये गेल्या दहा वर्षांत या चार तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
बिबट्याचे जंगलातील काही भागावर अधिराज्य असते. दुसऱ्या बिबट्याला तो त्या भागात घुसखोरी करून देत नाही. त्यामुळे वारंवार बिबट्यांमध्ये होणारी लढाई त्यांच्या जिवावर बेतते. अशा काही प्रकारामध्ये दोन बिबट्यांचा जखमी होऊन मृत्यू झाला आहे. बिबट्यांचा अधिवास धोक्यात आल्यामुळे आणि जंगलातील नैसर्गिक साखळीचा समतोल न राहिल्याने ते भक्ष्याच्या शोधात मानवीवस्तीमध्ये अधिक दिसू लागले आहेत. गेल्या वर्षी एकूण २८ बिबट्यांचे वनविभाग रत्नागिरीने रेस्क्यू केले. त्यामध्ये २८ बिबट्यांपैकी १३ बिबट्यांचा मृत्यू झाला. कुठे विहिरीत पडल्याने मृतावस्थेत आढळून आले, फासकीत अडकून किंवा वाहनाच्या धडकेत मृत झालेल्यांचा यामध्ये समावेश आहे. रेस्क्यूमधील १५ बिबट्यांना सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यंदा २०२५ मध्ये वनविभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, एकूण १८ बिबट्यांचा शोध लागला; पण त्यात ८ मृत्यू झाल्याचे कळते. ८ बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले तर १ टी. टी. सेंटरला पाठवण्यात आला. रत्नागिरी वनविभागातील ४ तालुक्यांमधील सुमारे १२० गावांमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
----
चौकट
ब्लॅक पॅंथरचेही दर्शन
संगमेश्वर, राजापूर तालुक्यात ब्लॅक पॅंथर यापूर्वी आढळले आहेत. नुकताच रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथेही चार दिवसांपूर्वी ब्लॅक पॅंथरचे दर्शन झाले. त्याच्याबरोबरच बिबट्याही या ठिकाणी एकत्र दिसले. त्या ठिकाणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चाही केली.
कोट
गेल्या काही वर्षामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे तसेच अधिवास धोक्यात आल्यामुळे भक्ष्याच्या शोधात बिबट्यांचा मानवीवस्तीतील वावर अधिक वाढला आहे.
- प्रकाश सुतार, परिक्षेत्र वनाधिकारी, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.