कोकण प्रदेश उपाध्यक्षपदी अमृत गोरे
- rat26p9.jpg-
25N94412
अमृत गोरे
‘धनगर समाज महासंघा’च्या
कोकण प्रदेश उपाध्यक्षपदी गोरे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. 26ः ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या कोकण प्रदेश उपाध्यक्षपदी अमृत गोरे यांची निवड करण्यात आली असून, रत्नागिरी जिल्हा प्रभारी म्हणूनही त्यांची वर्णी लागली आहे. कोकण प्रदेश युवक आघाडीची ५१ जणांची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश युवक आघाडीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई (विभाग) या जिल्ह्यातून ५१ पदाधिकाऱ्यांची निवड कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी कार्यकारिणी राष्ट्रीय अध्यक्ष अजय पाल होळकर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.
५१ जणांमधील आठजणांची जिल्हा प्रभारीची नियुक्ती केली आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी अमृत गोरे यांच्याकडे देण्यात आली आहे. या प्रसंगी काळे म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील धनगर समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असल्यामुळे त्यांची वर्णी लागली आहे. कोकणातील धनगर समाजाच्या उन्नतीसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार करत संघटनेचे ध्येयधोरण कामाची पद्धतदेखील त्यांनी जाहीर केले आहे. कोकणातील धनगर समाजाच्या उन्नतीसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी या वेळी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.