सहकारी बोर्डाच्या समस्यांवर लवकरच तोडगा
rat२६p२.jpg-
P२५N९४४००
रत्नागिरी ः राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांना निवेदन देताना रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हेमंत वणजु.
सहकारी बोर्डाच्या समस्यांवर लवकरच तोडगा
६ ऑक्टोबरला बैठक ; अध्यक्ष प्रवीण दरेकर रत्नागिरीत येणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : जिल्हा सहकारी बोर्डातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष तथा विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर लवकरच रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. यासाठी जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हेमंत वणजू यांनी त्यांची मुंबईत भेट घेतली. त्यानुसार ६ ऑक्टोबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तिन्ही जिल्ह्याची बैठक होणार आहे.
जिल्हा सहकारी बोर्डांना अधिक सक्षम करण्यासाठी आर्थिक पाठबळ कसे देता येईल, सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाबाबत जिल्हा बोर्डांना भेडसावणाऱ्या अडचणींवर चर्चा करून नावीन्यपूर्ण संकल्पना राबवण्यावर निर्णय घेणे, रत्नागिरी जिल्ह्यात स्वतंत्र सहकार भवन उभारण्यासाठी शासकीय जमीन मिळवणे, सहकारी शिक्षण-प्रशिक्षणासाठी आवश्यक कर्मचारी आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करणे अशा विविध प्रश्नांवर तोडगा काढणे रत्नागिरीत होणाऱ्या बैठकीत शक्य होणार आहे. याबाबत रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष वणजू यांनी आमदार दरेकर यांच्याशी नुकतीच चर्चा केली. जिल्ह्यातील समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. यावर दरेकर यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्हा बोर्डांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने एक नवीन धोरण अंमलात आणले जाणार आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राला अधिक बळकटी मिळण्यास मदत होईल, असे दरेकर यांनी सांगितले तसेच रत्नागिरीत बैठक घेण्याचेही आश्वासन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.