धामणीत वाघजाई-नवलाई देवीचा नवरात्रोत्सव

धामणीत वाघजाई-नवलाई देवीचा नवरात्रोत्सव

Published on

- rat२६p१४.jpg-
२५N९४४४७
धामणीतील वाघजाई-नवलाई देवी.

वाघजाई-नवलाई देवीचा
धामणीत नवरात्रोत्सव
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २६ ः तालुक्यातील धामणी येथील ग्रामदैवत वाघजाई-नवलाईदेवीचा नवरात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. गेली अनेक वर्षे अखंडपणे चालू असलेल्या या उत्सवात परंपरा जपण्यावर ग्रामस्थांनी भर दिला आहे.
उत्सवाच्या कालावधीत दररोज रात्री देवीची आरती व भजनाचा कार्यक्रम स्थानिक ग्रामस्थांच्या पुढाकाराने पार पडत आहे. त्यामध्ये महिला, पुरुष, तरुण आणि वृद्ध मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. विशेष म्हणजे जाखडी या पारंपरिक लोककलांचे सादरीकरणही उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरते. देवीचे मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले असून, देवीच्या गाभाऱ्यात फुलांची सुरेख सजावट करण्यात आली आहे. प्रत्येक दिवशी देवीला विविध रंगांच्या आकर्षक वस्त्रांचा साज चढवला जातो. या सर्व सजावटीतून ग्रामस्थांचा भक्तिभाव आणि कलात्मकता स्पष्टपणे दिसून येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com