-कुंचल्यातून त्यांनी साकारली देवीची विविध रुपे

-कुंचल्यातून त्यांनी साकारली देवीची विविध रुपे

Published on

-rat२६p२०.jpg-
२५N९४४९४
सारिका पांचाळ
-rat२६p२१.jpg-
२५N९४४९५
साखरपा ः सारिका पांचाळ यांनी साकारलेली देवीची विविध रूपे सुवर्णतारा, कृष्णतारा, शैलपुत्री, देवी कालरात्री.
---
कुंचल्यातून साकारली देवीची विविध रूपे
चित्रकार सारिका पांचाळ; नवरात्रीनिमित्त विशेष चित्रे
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. २६ : सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्सव भक्तिभावात सुरू आहे. देवीचा उत्सव म्हणून नवरात्रीच्या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सायले (ता. संगमेश्वर) येथील चित्रकार सारिका पांचाळ यांनी कुंचल्यातून देवीची विविध रूपे साकारली आहेत.
सारिका पांचाळ या मूळच्या मुंबईच्या. एसएनडीटी महाविद्यालयातून त्यांनी बीव्हीए या विषयात पदवी घेतली. शालेय वयापासूनच त्यांना चित्रकलेची आवड निर्माण होती. कंपोझिशन आणि निसर्गचित्रे हे त्यांचे आवडते विषय होते. त्यात त्यांनी प्रावीण्य मिळवले. कॉलेज शिकत असताना त्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेत बक्षिसे मिळवली आहेत. विवाहानंतर त्या गेली दोन वर्षे संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथे स्थायिक असून, तिथे त्या आपली कला जोपासत आहेत. त्यांनी नवरात्रीनिमित्त देवीची विविध रूपे आपल्या चित्रातून साकारली आहेत. त्यात सुवर्णतारा, कृष्णतारा, शैलपुत्री आणि कालरात्री ही रूपे चित्रातून साकारली आहेत.
---
चौकट
देवीची रूपे काय सांगतात
सुवर्णतारा हे रूप भक्तांना सौभाग्य आणि स्थैर्याचा आशीर्वाद देते. कृष्णतारा हे रूप आक्रमक आहे. या रूपातून देवी वाईटाचा नाश करते. मासर, यम, मामोस, राक्षस, यक्ष, किन्नर, बिमीपती आणि त्सान अशा वाईटांचा नाश करून ही देवी आपले रक्षण करते. शैलपुत्री हा देवी सतीचा अवतार असून, पर्वतांचा अधिपती राजा हिमावत याची ती कन्या आहे. देवी कालरात्री हा माता दुर्गेचा अवतार आहे, असे रसिका पांचाळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com