मळण रोड-शृंगारतळी बाजारपेठेत स्वच्छता

मळण रोड-शृंगारतळी बाजारपेठेत स्वच्छता

Published on

गुहागर तालुक्यात स्वच्छतेचा जागर
मळण रोड-शृंगारतळी बाजारपेठ चकाचक; रॅलीतून प्रबोधन
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २६ ः सेवा पंधरवड्याअंतर्गत गुहागर तालुक्यात ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत मळण रोड व शृंगारतळी बाजारपेठेत अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी स्वच्छता केली.
गुहागर तालुक्यात पाटपन्हाळे हायस्कूल येथे स्वच्छता मिशनची शपथ घेऊन स्वच्छता मोहिमेची सुरुवात झाली. यावेळी हायस्कूल ते बाजारपेठ अशी स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यानंतर मळण रोड व शृंगारतळी बाजारपेठेमध्ये स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेंतर्गत ग्रामपंचायतस्तरावर कचरा वर्गीकरण, कचरा संकलन, ग्रामस्थांमध्ये जनजागृती व कचऱ्यावर प्रक्रिया करणे, ग्रामपंचायत स्तरावर प्राधान्याने कचऱ्याचे वर्गीकरण करणे आवश्यक असल्याने त्यासाठी प्रामुख्याने ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता शाश्वत ठेवण्यासाठी स्वच्छता श्रमदान मोहीम राबविण्यासाठी सर्व शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, सामाजिक संस्था, महिला व तरुण मंडळ, बचतगट, महाविद्यालयीन विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. मोहीम ग्रामपंचायत क्षेत्रातील पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, सागरी किनारी, खाडी किनारी, गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर आढळणारा कचरा, ऐतिहासिक वास्तू, बाजारपेठ आदी ठिकाणी प्लास्टीकमुक्त व स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.
मोहिमेत जिल्हा परिषद अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, गटशिक्षणाधिकारी गळवे, पंचायत समितीचे सर्व कर्मचारी, पाटपन्हाळे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असीम साल्हे आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com