मैत्रीणीच्या आत्महत्येने आयुष्यच बदललं

मैत्रीणीच्या आत्महत्येने आयुष्यच बदललं

Published on

-rat२६p३२.jpg-
२५N९४५७१
पावस ः गोळप कट्टा कार्यक्रमात बोलताना डॉ. अक्षय फाटक
-----
मैत्रिणीच्या आत्महत्येने आयुष्यच बदललं
डॉ. अक्षय फाटक ःसायबर क्राईमविरोधात लढण्याचा निर्धार

गोळप कट्टा---लोगो
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २६ ः पुढे काय करायचे हे ठरवत असताना, काकांच्या सल्ल्यानुसार पुण्यामध्ये जाऊन अवघड परीक्षा असताना मायक्रोसॉफ्ट आणि लिनक्स इंजिनिअर झालो. रत्नागिरीमध्ये कॉम्प्युटर सोल्युशनचा व्यवसाय सुरू केला. हे करत असताना मैत्रिणीच्या बाबतीत एक पुण्यामध्ये विपरीत घटना घडली. तेव्हापासून सायबर क्राईमद्वारे कोणाचाही बळी जाऊ देणार नाही असे ठरवून सायबर क्राईममध्ये काम करण्याचे ठरवले आणि ते आजतागायत सुरू आहे, असे संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील सायबरतज्ज्ञ डॉ. अक्षय फाटक यांनी सांगितले.
गोळपकट्टाच्या कार्यक्रमात डॉ. अक्षय फाटक यांनी आपला प्रवास उलगडला. आई-बाबांचा फोन आल्यानंतर घरी एका तासात पोचता आले पाहिजे या दृष्टीने इतक्यात लांब काही करायचे नाही, असे ठरवले आणि कोणाच्या हाताखाली काम करायचे नाही, असे ठरवून सायबर सोल्युशनचा व्यवसाय सुरू केला. कोरोनाच्या काळात घडलेल्या घटनेमुळे आयुष्य बदलून गेले. पुण्यातील मैत्रिणीने तिचा चेहरा वापरून अश्लील फिल्म व्हायरल केली गेल्याने आत्महत्या केली. त्या वेळी मोबाईल नेटवर्क नव्हते. मी चार दिवसांनी नेटवर्कमध्ये आल्यावर तिचे १५२ मिस्ड कॉल आलेले कळले. तेव्हा चौकशी केल्यावर मला सगळा प्रकार कळला. पुण्याला जाऊन काय झाले ते सगळे समजून घेतले आणि खूप अपराधी वाटलं. मला कॉल लागला असता तर मी तिला कदाचित वाचवू शकलो असतो. त्या वेळी ठरवलं की, यापुढे मी सायबर क्राईमद्वारे कोणाचाही बळी जाऊ देणार नाही. जिल्ह्यातील सायबर क्राईम आणि हॉकिंग संपूर्ण बंद होण्यासाठी प्रयत्न करेन आणि त्यासाठी पैसे घेणार नाही. माझ्या या निर्णयाला माझे आई, बाबा, कुटुंबीय माझ्या पाठीशी ठाम राहिले. त्यामुळे आजही मी हे काम करतोय. सायबर जागृतीबद्दल मी लेख लिहीत होतो.

चौकट
७५०हून अधिक हॅक अकाउंटवर काम
डिसेंबर २२ मध्ये एका मुलीने मला हॅक झालेला फेसबुक अकाउंट रिकव्हर करण्याची विनंती केली. साडेसहा तास बसून मी तो रिकव्हर केला. आता त्यासाठी मला दोन ते पाच मिनिटे लागतात. त्यानंतर आजपर्यंत ७५० पेक्षा जास्त हॅक झालेले देशातील आणि ऑस्ट्रेलिया, अमेरिका, न्युझिलंड, हाँगकाँग इ. देशातील सोशल मीडिया अकाउंट रिकव्हर करून दिले आहेत.

चौकट
चोवीस तास उपलब्ध
सायबर अडचणी आणि अकाउंट हॅक अशा गोष्टींसाठी मी फोनवर चोवीस तास उपलब्ध असतो आणि राहीन. आई-बाबा यांच्याकडून माझ्यावर झालेले संस्कार, त्यांच्याकडून कळत-नकळत शिकलेल्या अनेक गोष्टी, त्यांचा पाठिंबा यांच्यामुळे मी घडलो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com