-बीएमडब्ल्यू बर्लिन वर्ल्ड मॅरेथॉनमध्ये
- ratchl२६२.jpg -
२५N९४५८२
चिपळूण ः संध्या दाभोळकर यांचा सत्कार करताना भाजप नेते प्रशांत यादव व सहकारी.
-------
‘बीएमडब्ल्यू’ मॅरेथॉनमध्ये
संध्या दाभोळकरांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ ः खेर्डी येथील क्लिनिकल न्युट्रिशनिस्ट, स्पोर्ट्स न्युट्रिशनिस्ट तसेच न्युट्रो जेनिमिक्स कौन्सिलर संध्या दाभोळकर यांनी जगप्रसिद्ध ‘बीएमडब्ल्यू बर्लिन वर्ल्ड मॅरेथॉन’ (४२ किमी) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून ऐतिहासिक कामगिरी केली.
या स्पर्धेसाठी भारतातून केवळ दोन महिला धावपटूंना संधी मिळाली होती. त्यामध्ये संध्या दाभोळकर यांची निवड होणे ही चिपळूणसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या त्या चिपळूणमधील पहिल्या व एकमेव महिला धावपटू ठरल्या आहेत. खेर्डी येथील डॉ. संतोष दाभोळकर यांच्या त्या पत्नी आहेत. गेली सलग बारा वर्षे त्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये इंटरनॅशनल रनर म्हणून धावत आहेत. टाटा अल्ट्रा इंटरनॅशनल, टीसीएस बंगलोर (५ वेळा), एअरटेल दिल्ली रन (३ वेळा), वाशी, ठाणे, सातारा हिल मॅरेथॉन यांसह देशातील अनेक नामवंत शर्यतींमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. सचिन तेंडुलकर आयडीबीआय मॅरेथॉनच्या त्या सलग तीन वर्षे ब्रँड अॅम्बेसिडर होत्या. दोनशेहून अधिक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन विक्रम केलेल्या संध्या दाभोळकर यांची निवड बर्लिनसाठी होणे अपेक्षितच होते. २१ सप्टेंबरला जर्मनीतील बर्लिन येथे ही स्पर्धा झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.