देवबाग विकास मंडळाचे कार्य कौतुकास्पद

देवबाग विकास मंडळाचे कार्य कौतुकास्पद

Published on

94737
देवबाग विकास मंडळाचे कार्य कौतुकास्पद

उल्हास तांडेल ः शाळा क्रमांक २ च्या वर्गखोल्यांचे लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ : अखिल देवबाग विकास मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. देवबागवासीय संस्थेच्या नेहमीच पाठीशी आहोत. संस्थेला नवीन इमारत बांधण्यासाठी जी काही प्रशासकीय व इतर मदत लागेल, त्यासाठी वैयक्तिक व ग्रामपंचायतीकडून सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन सरपंच उल्हास तांडेल यांनी केले. देवबाग शाळा क्र. २ च्या वर्गखोल्यांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
देवबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवबाग क्र. २ ही शाळा डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल, देवबाग या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यावर डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूलमधील दोन अद्ययावत वर्गखोल्यांमध्ये शाळा क्र. २ सुरू केली आहे. या वर्गखोल्यांचे उद्‍घाटन सरपंच तांडेल यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषद शाळा क्र. २ देवबाग ही शाळा देवबागमध्ये भाड्याच्या खोलीत भरविण्यात येत होती. त्यामुळे देवबाग हायस्कूलकडून या शाळेसाठी दोन वर्गखोल्या उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे होता. देवबाग ग्रामपंचायत, पालक आणि देवबाग हायस्कूल संस्थाचालकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने त्यास मान्यता दिली. या शाळा स्थलांतराच्या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य पास्कोल रॉड्रिक्स, फिलसू फर्नांडिस, स्वरा तांडेल, अखिल देवबाग विकास मंडळ मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास येरागी, सदस्य पंकज सामंत, नीलेश सामंत, सुचिता तारी, कृष्णा मालंडकर, ग्रामस्थ रमेश मांजरेकर, देवबाग हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रचना खोबरेकर, जिल्हा परिषद शाळा क्र. २ च्या मुख्याध्यापिका प्रियांका तांबे, शिक्षिका हिना बागबान, एसएमसी अध्यक्षा अश्विनी गावकर, अंगणवाडी मदतनीस निर्मला गावकर, पालक सिद्धेश तारी, श्वेता तारी, लक्ष्मी मयेकर, धनश्री सारंग आदी उपस्थित होते.
---------
...तर शाळा बंद पडली असती!
श्री. येरागी यांनी, जिल्हा परिषद शाळा बंद पडली असती, तर गावातील लोकांचे दाखले व इतर माहिती तालुक्याच्या ठिकाणी हलवावी लागली असती. ही शाळा देवबाग हायस्कूलमध्ये आणल्याने सर्व माहिती आपल्याच गावात सुरक्षित राहील. तसेच लवकरच २ खोल्यांची स्वतंत्र इमारत बांधून त्याचा स्वतंत्र कारभार राहील. शाळेच्या विद्यार्थ्यांना देवबाग हायस्कूलमधील संगणक कक्ष, प्रयोगशाळा, प्रशस्त मैदान, पिण्यासाठी आरओ वॉटर, अद्ययावत स्वच्छतागृह आदी सुविधांचा लाभ घेता येणार आहे, असे सांगितले. रूपेश खोबरेकर यांनी सूत्रसंचालन केले. विवेक गोसावी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com