रत्नागिरी- डॉ. सुश्रुत तेंडुलकर यांना सुवर्णपदकासह फेलोशिप
rat27p17.jpg
94778
रत्नागिरी : असोसिएशन ऑफ कोलन अँड रेक्टल सर्जन ऑफ इंडियाकडून डॉ. सुश्रुत तेंडुलकर यांना एफएसीआरएसआय फेलोशिप प्रदान करताना तज्ज्ञ मान्यवर.
------------
डॉ. सुश्रुत तेंडुलकर यांना
सुवर्णपदकासह फेलोशिप
एफएसीआरएसआय; भारतात सर्वप्रथम येण्याचा मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : असोसिएशन ऑफ कोलन अँड रेक्टल सर्जन ऑफ इंडिया (ACRSI) या संस्थेकडून अत्यंत मानाची अशी एफएसीआरएसआय (FACRSI) ही फेलोशिप डॉ. सुश्रुत तेंडुलकर यांनी भारतात प्रथम क्रमांक आणि सुवर्णपदकासह पटकावली.
ही परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात आली होती. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, डॉ. तेंडुलकर यांनी प्रथम क्रमांकासह रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. डॉ. सुश्रुत हे जनरल सर्जन असून, त्यांचे शिक्षण मुंबईत झाले आहे. त्यांनी मुंबईच्या कुपर वैद्यकीय महाविद्यालयात सर्जन म्हणून व कळवा, ठाणे येथील राजीव गांधी शासकीय महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर व सर्जन म्हणून काम केले आहे तसेच रत्नागिरी शासकीय महाविद्यालयातदेखील सर्जन म्हणून काम पाहिले आहे.
कॉम्प्लेक्स फिस्टुला, पाईल्स, पायलोनिडल सायनससारख्या आजारावरील उपचारात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो तसेच इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसिज, मोठ्या आतड्याचा कॅन्सरसारख्या गुंतागुंतीच्या रोगाचे दुर्बिणीतून निदान (कोलॉनोस्कोपी) व उपचारात, शस्त्रक्रियेत त्यांनी प्रावीण्य मिळवले आहे. डॉ. तेंडुलकर यांच्या यशाबद्दल वडील डॉ. प्रमोद तेंडुलकर, कुटुंबीय तसेच रत्नागिरीतील डॉक्टरांनी अभिनंदन केले. डॉ. तेंडुलकर हे सध्या नाचणे रोड पॉवरहाऊस येथील डॉ. गोंधळेकर क्लिनिक येथे स्वतंत्र प्रॅक्टिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.