दापोली-प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर कोकण कृषी विद्यापीठाचा अन्याय
rat27p19.jpg
94793
दापोलीः प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी कोकण कृषी विद्यापिठाच्या कुलसचिवांची भेट घेतली. त्या वेळी उपस्थित शेतकऱ्यांसमवेत उबाठा पक्षाचे पदाधिकारी.
-----------
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवरच कृषी विद्यापिठाचा अन्याय
जमीन देणाऱ्यांना नोकरी नाही; ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २८ : आम्ही कृषी विद्यापिठासाठी जमीन दिली; पण आम्हाला अद्याप नोकरी नाही. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही, असा थेट इशारा देत दापोली तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी कोकण कृषी विद्यापिठाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक वर्षे विद्यापिठासाठी काम करूनही कायमस्वरूपी नोकरी न मिळाल्याने या शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे.
विद्यापिठाच्या भरतीबाबतच्या जाहिरनाम्यात विद्यापीठ सेवेत असणाऱ्यांना प्राधान्य देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. दहा, बारा, अगदी सतरा वर्षे राबणाऱ्या शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला होता; पण त्याऐवजी अनुभव नसलेल्या नवख्या उमेदवारांना निवडून प्रकल्पग्रस्तांना दूर ठेवण्यात आले, असा थेट आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. २५ सप्टेंबरला जवळपास ४० प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने विद्यापिठाचे कुलसचिव संतोष सावर्डेकर यांची भेट घेतली. आम्हाला सेवेत सामावून घ्या अन्यथा आमच्या संपादित जमिनी परत द्या जेणेकरून पुन्हा शेती करू, अशी ठाम मागणी त्यांनी केली; मात्र कुलसचिवांनी थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष ठामपणे उभा आहे. तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी विद्यापीठ प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.
कर्मचारी भरतीत राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. निर्णय झाला नाही तर शेतकरी कुटुंबांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा गुजर यांनी दिला आहे. या वेळी सचिव नरेंद्र करमरकर व शहराध्यक्ष संदीप चव्हाण हे उपस्थित होते. कुलगुरू संजय भावे यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती देऊन अंतिम निर्णय त्यांच्या हाती सोपवला जाईल, असे कुलसचिव सावर्डेकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.