हर्षे, आठल्ये, तारळकर, देवस्थळी यांचा विशेष सन्मान

हर्षे, आठल्ये, तारळकर, देवस्थळी यांचा विशेष सन्मान

Published on

-rat२७p७.jpg-
२५N९४७२३
विलास हर्षे, अथर्व आठल्ये, प्रथमेश तारळकर, प्रसाद देवस्थळी, अजिंक्य पोंक्षे.
-----
हर्षे, आठल्ये, तारळकर, देवस्थळी यांचा विशेष सन्मान
कऱ्हाडे ब्राह्मण संघ; ८ ऑक्टोबरला अजिंक्य पोंक्षे यांची गायन मैफल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे आयोजित उल्लेखनीय कलाकारांचा विशेष सन्मान ८ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. यात संगीत रंगभूमी सेवा सहयोग पुरस्काराचे मानकरी, ऑर्गनवादक विलास हर्षे, संगीत अलंकार परीक्षेत तबलावादनात भारतात प्रथम अथर्व आठल्ये, संगीत अलंकार परीक्षेत पखवाज वादनात भारतात प्रथम प्रथमेश तारळकर आणि जगप्रसिद्ध कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण करणारे प्रसाद देवस्थळी यांचा यात समावेश आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अजिंक्य पोंक्षे यांच्या गायनाची मैफलसुद्धा रंगणार आहे. मैफलीत अथर्व आठल्ये तबलासाथ, प्रथमेश तारळकर पखवाजसाथ आणि चैतन्य पटवर्धन ऑर्गनसाथ करणार आहेत. ८ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० वाजता संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर व उपाध्यक्ष मानस देसाई व व्यवस्थापक कमिटी सदस्यांनी केले आहे.
सन्मानमूर्ती विलास हर्षे यांचे हार्मोनियम/ऑर्गनचे लौकिक शिक्षण झाले नाही; परंतु गोविंदराव पटवर्धन, विश्वनाथ कान्हेरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. भालचंद्र पेंढारकर, अरविंद पिळगावकर, नारायण बोडस, आफळेबुवा, दत्तदासबुवा घाग यांसारख्या मान्यवरांना नाटक, मैफल, कीर्तनात ऑर्गनसाथ केली आहे. ते संगीत नाटकाना संगीत मार्गदर्शन करतात. राज्य नाट्यस्पर्धेत या नाटकांना पुरस्कार तसेच संगीत मार्गदर्शन व ऑर्गन साथीचे पुरस्कार मिळाले आहेत.
तबलावादन परीक्षेत देशात प्रथम क्रमांकप्राप्त अथर्व आठल्ये हा एम. ए. (संगीत-तबला, तालवाद्य) असून, बी. ए. एफ. पदवी मिळवली आहे. त्याचे शिक्षण हेरंब जोगळेकर, पं. विश्वनाथ शिरोडकर, तालमणी पं. प्रवीण करकरे यांच्याकडे सुरू आहे. रत्नागिरी जिल्हा तबला सोलो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई विद्यापीठ राज्यस्तरीय युवा महोत्सवात रौप्य पदक पटकावले आहे. संगीत जय जय गौरीशंकर या नाटकासाठी तबला साथसंगतीसाठी द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
पखवाजवादनात देशात प्रथम क्रमांक मिळवत प्रथमेश तारळकर यानेही रत्नागिरीचे नाव कोरले आहे. त्याने वयाच्या दहाव्या वर्षापासून पखवाजवादनाचे शिक्षण परशुराम गुरव, सुरेश तळवलकर यांच्याकडे घेतले. भारतात व भारताबाहेर प्रतिष्ठित संगीतसभा, समारोहात अनेक दिग्गज गायक, वादकांसोबत पखवाजवादन केले. संगीत राज्य नाट्यस्पर्धेत महाराष्ट्र, गोव्यात सर्वोत्तम वादक म्हणून त्याचा गौरव झाला आहे. या कार्यक्रमात मैफल रंगवणारे अजिंक्य पोंक्षे हे एमए (संगीत) असून, ते आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत. दोन संगीत नाटकांसाठी गायक नट म्हणून रौप्यपदक पटकावले आहे.

चौकट १
क्रीडा पर्यटनाची पायाभरणी
सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक संचालक प्रसाद देवस्थळी यांनी कोकणामध्ये क्रीडा पर्यटनाची पायाभरणी केली आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. अनेक सायक्लोथॉनसह कास अल्ट्रा मॅरेथॉन, लोणावळा, टाटा, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन आणि कॉम्रेड्स मॅरेथॉन त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यांनी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन व गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन सुरू करून कोकणात मॅरेथॉन संस्कृतीची मुहूर्तमेढ रोवली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com