बावनदी ते पाली मार्गाने घेतले ८ बळी

बावनदी ते पाली मार्गाने घेतले ८ बळी

Published on

rat27p23.jpg-
94804
रत्नागिरीः मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील डेंजर स्पॉटचा तीव्र चढाव.
--------------
बावनदी ते पाली मार्गाने घेतले आठ बळी
पावणेदोन वर्षांत ३५ अपघात; ८८ जखमी, हातखंबा डेंजर स्पॉटवर बॅरल ठेवून बोळवण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा उतारात हे ठिकाण अतिशय धोकादायक बनले आहे. बावनदी ते पाली या टप्प्यात पावणेदोन वर्षात ३८ अपघात झाले. यामध्ये ८८ लोक जखमी झाले तर ८ जणांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब आकडेवारीवरून समोर आली आहे. हातखंबा उतारावर प्रशासनाने फक्त बॅरल ठेवून बोळवण करत तात्पुरती उपाययोजना केली आहे.
हातखंबा उतारावर वारंवार अवजड वाहनांचे अपघात होत आहेत. रस्त्याच्या चौपदरीकरणामधील पुलाचे अर्धवट राहिलेल्या कामामुळे हा स्पॉट अधिकच धोकादायक बनला आहे. या मार्गावर अवघड वळणांसह तीव्र चढ - उतार आहेत. अवजड वाहनांवरील चालक हे उत्तरप्रदेश, कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र आदी ठिकाणचे असल्याने त्यांना कोकणातील वेड्यावाकड्या रस्त्यांचा अंदाज येत नाही. त्यांचा अनुभव आणि संयम कमी पडत असल्याने अपघात घडत असल्याचे तज्ञांचे मत आहे.
गेल्या वर्षभरात म्हणजेच २०२४ मध्ये या मार्गावर अठरा अपघात झाले. यामध्ये ४४ जण जखमी झाले तर २ मृत्यू झाले. जानेवारी २०२५ पासून सप्टेंबरअखेर या मार्गावर १९ अपघात झाले. त्यात ४३ लोक जखमी झाले तर ६ जणांना आपला जीव गमवावा लागला. या मार्गावरील अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता अवजड वाहनांबाबत प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. बॅरल लावून प्रशासनाने बोळवण केली आहे, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com