कृषी उत्पन्न बाजार समितीची उद्या वार्षिक सभा
कृषी उत्पन्न बाजार समितीची उद्या वार्षिक सभा
कणकवली,ता. २८ ः सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा मंगळवारी (ता. ३०) आयोजित करण्यात आली आहे. ही सभा माध्यमिक अध्यापक पतपेढी सभागृह, सिंधुदुर्ग नगरी येथे होणार आहे. या सभेस जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, विकास सोसायटी चेअरमन, संचालक, व्यापारी वर्ग, काजू प्रक्रियादार, कात प्रक्रियादार आणि इतर शेती मालावर प्रक्रियादार तसेच शेतकरी बंधू-भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे यांनी केले आहे. या सभेत सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची महाराष्ट्र राज्याच्या काजू बोर्डवर संचालक म्हणून झालेल्या निवडीबद्दल बाजार समितीतर्फे त्यांचा सत्कार होणार आहे. या सभेला जिल्ह्यातील व्यापारी, शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.