भाषण स्पर्धेत परिणीती राठोड प्रथम

भाषण स्पर्धेत परिणीती राठोड प्रथम

Published on

भाषण स्पर्धेत परिणीती राठोड प्रथम
चिपळूण, ता. २८ : जिजाऊ ब्रिगेड नारीशक्ती जनजागृती आभियानांतर्गत सती जिल्हापरिषद शाळेत नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून महानायिका या विषयावर भाषण स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये परिणीती राठोड हिने पहीला क्रमांक पटकावला.
यावेळी विद्यार्थ्यांनी जिजाऊ सावित्रीबाई रमाई आहिल्याबाई होळकर यांच्याविषयी माहिती दिली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रवीना गुजर व मिलन गुरव यांनी काम पहिले. भाषण स्पर्धेत पहीला क्रमांक परिणीती राठोड, दुसरा क्रमांक वेदीका राणीम, तृतीय क्रमांक अर्णव सकपाळ यांनी पटकावला. त्यांना चषक व प्रमाणापत्र देवून सन्मानीत करण्यात आले.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थीना प्रमाणपत्र देण्यात आले. संध्याताई घाडगे यांनी फळवाटप केले. यावेळी उपस्थित जिजाऊ ब्रिगेड रत्नागिरी जिल्हा संघटक रवीना गुजर, तालुकाध्यक्ष मिलन गुरव, तालुका सचिव पुर्वाताई आहिरे, तालुका संघटक संध्या घाडगे, खेड तालुकाध्यक्ष रोहीणीताई मोरे, शहराध्यक्ष वर्षा खटके, शहर उपाध्यक्ष अपूर्वा गायकवाड आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com