पीएनजीतर्फे दसरा-दिवाळी निमित्त डबल डिलाईट ऑफर
सांगलीला वापरली आहे.
कोल्हापूर सर्व आवृत्तीसाठी आवश्यक
------------------
95076
‘पीएनजी’तर्फे दसरा-दिवाळी
निमित्त ‘डबल डिलाईट ऑफर’
सोने, हिरे दागिने खरेदीवर सोन्याची नाणी मोफत ः घडणावळीवर सूट
सांगली, ता. २८ ः दसरा आणि दिवाळी हे शुभ मानले जाणारे सण असल्याने या पर्वात दागिन्यांची खरेदी करण्याला विशेष महत्त्व असते. सांगलीतील १९२ वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफी पेढीतर्फे दसरा-दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफरची घोषणा करण्यात आली आहे.
‘पीएनजी दिवाळी डबल डिलाईट ऑफर’नुसार, सोने व हिरे दागिने खरेदीवर सोन्याची नाणी मोफत आणि सोबत घडणावळीवर देखील सूट असा दुहेरी लाभ मिळणार आहे. ही ऑफर ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ‘पीएनजी’च्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्व शाखांमध्ये लागू असणार आहे. ‘पीएनजी दिवाळी डबल डिलाईट ऑफर’च्यानिमित्ताने शोरूममध्ये सोनं, चांदी व डायमंड ज्वेलरीच्या विविध नवनवीन डिझाईन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पारंपरिक कलेक्शनसह आधुनिक डिझाईनचे दागिने, लग्नसोहळ्यासाठी उपयुक्त सेट्स तसेच सणावाराला साजेसे दागिने यांची विशेष शृंखला दाखल झाली आहे.
‘दसरा आणि दिवाळी हा आनंद, समृद्धी आणि सुवर्णक्षणांचा उत्सव आहे. आम्ही ग्राहकांसाठी उत्तम गुणवत्ता, आधुनिक व पारंपरिक डिझाईन्स आणि विश्वासार्ह सेवा देण्यास वचनबद्ध आहोत. या पर्वानिमित्त जाहीर केलेल्या विशेष ऑफर्समुळे ग्राहकांचा खरेदीचा आनंद द्विगुणित होईल,’ असा विश्वास ‘पीएनजी’ व्यवस्थापनाने व्यक्त केला.
यावेळी शोरूममध्ये ग्राहकांसाठी खास सणावाराचे वातावरण तयार करण्यात आले आहे. सुवर्ण खरेदीला शुभ मानणाऱ्या या दिवसांत मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा प्रतिसाद मिळतो. ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आणि ऑफरच्या अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या शाखेला भेट द्यावी, असे आवाहन पेढीतर्फे करण्यात आले आहे.
चौकट
‘पीएनजी’ म्हणजे पिढ्यान्पिढ्याची विश्वासार्हता
सांगली येथे सराफी पेठेत ‘पीएनजी’ची मुहूर्तमेढ २९ नोव्हेंबर १८३२ रोजी रोवली गेली. पेढीने स्थापनेपासूनच ग्राहकाभिमुख दृष्टिकोन, सचोटीचे व्यवहार आणि विश्वासार्हता ही त्रिसूत्री जपली आहे. पेढीच्या संचालकांनी हीच त्रिसूत्री सातव्या पिढीमध्येही तंतोतंत पालन करत जपली आहे. पेढीच्या याच त्रिसूत्रीमुळे ग्राहकांच्या अनेक पिढ्यांनी ‘पीएनजी’शी ऋणानुबंध जोडले आहेत.