मळगावमध्ये ''दुर्गामाता दौड''ला प्रतिसाद
९५१४६
मळगावमध्ये ''दुर्गामाता दौड''ला प्रतिसाद
शिवशंभू ग्रुपचे आयोजन ः शिवप्रेमींसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २८ ः शिवशंभू ग्रुप मळगावच्या वतीने प्रथमच आयोजित केलेल्या श्री दुर्गामाता दौडला हिंदूप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दौडीत सर्वजण पारंपरिक वेशभूषेत, तर विद्यार्थी शालेय वेशभूषेत सहभागी झाले होते.
सकाळी ८ वाजता येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली. दौडची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून व भगव्या ध्वजाचे पूजन, ध्वजास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अभिषेक रेगे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘राजमाता जिजाऊंनी छत्रपती श्री शिवाजी महाराज गर्भात असताना नवरात्री सणात अखंड नऊ दिवस तुळजा भवानीचा जागर करून जगदंबेच्या चरणी देशासाठी, हिंदू धर्मासाठी मागितलेले वरदान, मागितलेले आशीर्वाद हे पुनरुपी मागण्याची प्रथा म्हणजेच ‘दुर्गामाता दौड’ आहे.’’
या दौडीत छत्रपती श्री ‘शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवराय’, ‘भारत माता की जय’, ‘हिंदू धर्म की जय’ आदी घोषणा देण्यात आल्या. मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रस्तावाडी, सुतारवाडी, पिंपळवाडी, नाईकवाडीमार्गे श्री देव मायापूर्वचारी मंदिरापर्यंत दौड काढण्यात आली. मंदिरात पोहोचल्यावर सर्वांनी मायापूर्वचारी देवाचे व श्री देवी माऊलीचे दर्शन घेतले. त्यानंतर भगव्या ध्वजाला नमस्कार केला. गणपती, महादेव व दुर्गादेवीची व भारतमातेची आरती करून दौडीची सांगता करण्यात आली.
या दौडीमध्ये श्री शिवप्रतिष्ठानचे अभिषेक रेगे, सुमित नलावडे, शुभम घावरे, आकाश खिल्लारे, संपदा राणे, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे दुर्गसेवक सुनील राऊळ, एकनाथ गुरव, प्रताप परब, शुभम नाईक, गजानन दळवी, प्रकाश राऊळ, सहदेव राऊळ, रितेश राऊळ, ज्ञानेश्वर राणे, समिधा राऊळ, प्रगती राऊळ, हिंदू बंधू भगिनी व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.