कडधान्ये आणि पोषण सुरक्षा
जपूया बीज वारसा--------लोगो
हरितक्रांतीनंतर सत्तरच्या दशकात भारतात आलेल्या सोयाबीनने कडधान्यांच्या उत्पादनावर मात केली. भुईमुगासारखे पर्यावरणस्नेही पीक शेतांतून जवळपास हद्दपार झाले. ‘गरिबांचा काजू’ म्हणून ओळखला जाणारा शेंगदाणा हे द्विदल व तेलबियाचे पीक असून, त्याची पाने आणि पेंड गुरांसाठी पौष्टिक खाद्य ठरतात.
- rat२९p३.jpg-
P25N95263
- कुणाल अणेराव, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी सृष्टिज्ञान संस्था
-----
कडधान्ये आणि पोषण सुरक्षा
भारतात कडधान्ये आणि डाळींमध्ये प्रचंड वैविध्य आढळून येते. मूग, उडीद, मटकी, कुळीथ, लाख, वाल-पापडी या मूलनिवासी पिकांसोबतच हरभरा, तूर, वाटाणे, चवळी, मसूरसारख्या कडधान्यांच्या स्थानिक प्रजाती भारतातील प्रत्येक भागात आढळतात. यातील काही शेंगा ओल्या असताना भाजी म्हणून वापरल्या जातात तर काहींची बियाणी कडधान्ये म्हणून आणि काहींच्या डाळी करून सेवन केल्या जातात. मातीच्या आणि मानवी आरोग्याच्यादृष्टीने ही जैवविविधता अत्यंत महत्त्वाची आहे. पाण्याचा प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा आहे. प्रथिनांसाठी जर मांसाहारावर अवलंबून राहिले तर एक किलो चिकन किंवा मटणाच्या उत्पादनासाठी कडधान्यांच्या तुलनेत शंभरपट अधिक पाणी लागते. हवामान बदलाच्या संकटामुळे आधीच मर्यादित झालेले पाण्याचे स्रोत अशा पद्धतीने संपवणे धोकादायक ठरू शकते.
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या (FAO) निरीक्षणानुसार, लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशिया या खंडातील लक्षावधी लोकांना पौष्टिक घटक विशेषतः प्रथिनांचा पुरवठा करण्यासाठी कडधान्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. या खंडातील आहारसंस्कृतीमध्ये डाळी आणि कडधान्ये परंपरेने अग्रक्रमाने वापरली जातात. प्रथिनांचा मुख्य स्रोत म्हणून कडधान्यांना लोकांच्या आहारात मोलाचे स्थान राहिले आहे. डाळी आणि कडधान्यांच्या उत्पादनात प्रामुख्याने लहान व अल्पभूधारक शेतकरी पुढे असतात. त्यामुळे त्यांच्या आर्थिक विकासातही या पिकांची भूमिका मध्यवर्ती ठरते. तृणधान्यांच्या तुलनेत कडधान्यांना मिळणारा बाजारभाव अधिक असतो.
गेल्या सत्तर वर्षांत तृणधान्यांच्या उत्पादनात २३ टक्क्यांनी वाढ झाली; मात्र कडधान्यांच्या उत्पादनात ३० टक्क्यांची घट झाली. ही तूट भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते आणि परिणामी, कडधान्यांचे भाव महागतात. शासकीय गोदामांमध्ये गहू-तांदूळ सडत असताना भारतीयांच्या डाळ-कडधान्यांच्या गरजा आयातीवर भागवल्या जातात. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे तयार झालेले हे चित्र अतिशय विदारक आहे. जे खायला लागते तेच शेतकऱ्यांनी पिकवायला सुरुवात केली तर देशाला कोणत्याही कृषिमालाची आयात करावी लागणार नाही.
डाळी व कडधान्यांचे भाव वाढले की, अन्नसुरक्षा आणि पोषणसुरक्षा या दोन्ही धोक्यात येतात. प्राणीजन्य खाद्यपदार्थ पौष्टिक असले तरी ते महाग असतात; तुलनेत डाळी व कडधान्ये स्वस्त आणि सर्वसामान्यांना परवडणारी आहेत. जगातील सर्वात मोठा ग्राहकवर्ग भारतात असल्याने निर्यातीवर अवलंबून न राहता देशांतर्गत उत्पादनवाढीवर भर देणे गरजेचे आहे. शासनाने आधारभूत किमतीचे धोरण काटेकोरपणे राबवले आणि खरेदी यंत्रणा सक्षम केली तर कमी पाणी लागणाऱ्या कडधान्यांचे उत्पादन वाढवता येईल. कडधान्यांसोबतच शेवगा, हादगा, कांचन, बाभूळ, खैर, पळस, बोरे, काटेसावर, एरंड, शिकेकाई अशा झाडांमुळेही नत्र स्थिरीकरण होऊन मातीचे आरोग्य टिकून राहते. त्यामुळेच परंपरेने शेताच्या बांधावर या वृक्षांची लागवड केली जात होती; मात्र बाजारकेंद्री व्यवस्थेमुळे या सर्व पर्यावरणस्नेही पद्धती मागे पडल्या आहेत.
(लेखक स्वत: शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.