मराठवाड्याच्या मदतीला रत्नागिरीकर
-rat२९p१८.jpg-
२५N९५३१५
रत्नागिरी : हेल्पिंग हॅंड्सच्या पत्रकार परिषदेत सोमवारी बोलताना शिरीष सासणे. डावीकडून नंदू चव्हाण, नीलेश मलुष्टे, राजू भाटलेकर, कौस्तुभ सावंत, भैय्या वणजू, जयंतीलाल जैन आदी.
---
अतिवृष्टीत मराठवाड्याच्या पाठीशी रत्नागिरी
‘हेल्पिंग हॅंड्स’चा पुढाकार ; आर्थिक मदतीसह पथकही जाणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे अनेक जिल्हे बाधित आहेत. मानवतेच्या दृष्टिकोनातून नेहमीप्रमाणे अत्यंत गरीब व बळीराजाच्या मदतीसाठी रत्नागिरीतील हेल्पिंग हँड्सच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाणार आहे. प्रशासनाच्या सहकार्याने येत्या १० ऑक्टोबरपर्यंत निधी संकलन करून त्याचे योग्य वितरण केले जाणार असून, प्रत्येक व्यवहार पारदर्शक राहील अशी खबरदारी घेण्यात येत असल्याचे हेल्पिंग हॅंड्सतर्फे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर घरे, पीक, जनावरांचे नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्य व केंद्र सरकारकडून मदत करण्यात येत आहे. त्यांच्या मदतीला हेल्पिंग हॅंड्सतर्फेही मदत केली जाणार आहे. सेवेतून मानवता, मानवतेतून राष्ट्र या प्रेरणेने वेळोवेळी आपत्कालीन परिस्थितीत हेल्पिंग हॅंड्सच्या स्वयंसेवकांनी जिवाची पर्वा न करता मदतीचा हात पुढे केला आहे. ऑगस्ट २०१९ ला सांगली, कोल्हापूरचा महापूर, नोव्हेंबर २०१९ सैन्यभरती, मार्च २०२० कोविड, जून २०२० निसर्ग चक्रीवादळ, जुलै २०२१ चिपळूणचा महापूर अशा अनेक आपत्कालीन परिस्थितीमध्ये हेल्पिंग हँड्सने मदतीचा हात दिला आहे.
मराठवाड्याच्या मदतीसाठी हेल्पिंग हॅंड्सच्या पहिल्या बैठकीत वस्तुरूपी मदत न देता आर्थिक स्वरूपात मदतीचा निर्णय झाला. त्याच वेळी १८ जणांनी जवळपास २ लाख रुपये जमा केले. हेल्पिंग हँड्स ही एक सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या अनेक संस्थाचे प्रतिनिधित्व करत आहे. प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार, प्रशासन सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. जमा झालेली मदत योग्य ठिकाणी पोहोचवण्याच्यादृष्टीने शासनाकडून आलेल्या सूचनेप्रमाणे निधी वितरण करण्यात येणार आहे.
चौकट १
मदतनिधी केंद्र
हेल्पिंग हॅंड्सचे महाराष्ट्र बॅंकेत खाते उघडण्यात आले आहे. त्यावरही पैसे भरता येतील तसेच हॉटेल हर्षा, टीआरपी, वेद इलेक्ट्रॉनिक्स, साळवी स्टॉप, हॉटेल गोपाळ, मारुती मंदिर, मानस जनरल स्टोअर्स, स्वयंवर मंगल कार्यालयासमोर माळनाका, नोटरी श्रद्धा ढेकणे, जावकर प्लाझा जयस्तंभ, मलुष्टे स्टील अँड पाईप्स बाजारपेठ, रामआळी, जैन अँड जैन, आठवडा बाजार आणि हॉटेल सी फॅन्स, मांडवी येथे निधी देता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.