पैसा फंड स्कूलचे क्रीडास्पर्धेत यश

पैसा फंड स्कूलचे क्रीडास्पर्धेत यश

Published on

पैसाफंड स्कूलचे
क्रीडा स्पर्धेत यश
संगमेश्वर ः (कै.) मीनाताई ठाकरे हायस्कूल येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षे मैदानी शालेय क्रीडा स्पर्धेत पैसाफंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरच्या दहा खेळाडूंनी विविध स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवणारे विद्यार्थी असे ः मानव कुडतडकर-धावणे (तृतीय), पार्थ देसाई- धावणे (द्वितीय), सृष्टी शिंदे- धावणे (प्रथम); सृष्टी शिंदे- ४०० मी. धावणे (द्वितीय), रोशनी कळंबटे- उंच उडी (तृतीय), आदिती साटले- थाळीफेक (प्रथम), श्रुती बारगुडे- गोळाफेक (प्रथम), अनुष्का भुवड- धावणे (तृतीय), ओंकार घडशी- हर्डल्स (द्वितीय), ओंकार घडशी- धावणे (तृतीय). सर्व खेळाडूंचे तसेच मार्गदर्शक शिक्षक नवनाथ खोचरे, राकेश लोध यांचे संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक सचिन देव खामकर यांनी अभिनंदन केले आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंची निवड डेरवण येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.

रात्रीच्या रागांची
‘आसमंत’तर्फे मैफिल
रत्नागिरी : भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये समयानुसार रागांची रचना केली आहे. उत्तररात्र आणि पहाटेचे राग सहसा ऐकले जात नाहीत म्हणून आसमंत फाउंडेशन अशा एका गायन सभेचं आयोजन करत आहे. ४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ पासून पुढे उत्तररात्रीपर्यंत पुण्याच्या भरत नाट्यमंदिरात राग या गायन सभेत ऐकायला मिळणार आहेत, अशी माहिती आसमंतचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी दिली. ही मैफल सर्वांसाठी खुली आणि विनामूल्य असणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर कार्यक्रमास प्रवेश दिला जाईल. यात नागेश अडगावकर, आदित्य मोडक, केदार केळकर, मेहेर परळीकर, आदित्य खांडवे, रागेश्री वैरागकर, मीनल दातार, धनश्री घैसास, अंकिता जोशी, आणि ज्येष्ठ गायिका पौर्णिमा धुमाळे गायन सादर करणार आहेत. पंडित संगीत मिश्रा आणि अनुप कुलथे याचे अनुक्रमे सारंगी आणि व्हायोलिन वादन होणार आहे. तबलासाथ रामकृष्ण करंबेळकर, अभिजित बारटक्के आणि ऋषिकेश जगताप करतील. संवादिनीसाथ हर्षल काटदरे, निलंय साळवी आणि सुधांशू घारपुरे यांची असेल.

कृषी महाविद्यालयात
विद्यार्थ्यांचे स्वागत
सावर्डे ः मांडकी-पालवण येथील गोविंदराव निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात करण्यात आले. या वेळी पीजी फार्मचे संस्थापक विजयसिंह भोसले, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. निखिल चोरगे उपस्थित होते. डॉ. चोरगे यांनी विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमात असतानाच ध्येय निश्चित करून वेळेचे नियोजन करून ते साध्य करावे. त्याच पद्धतीने सर्व महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून, नवनवीन कल्पनांना बळ देण्याचे कामदेखील संस्था करते. विद्यार्थ्यांनीदेखील संशोधनावर भर द्यावा आणि चांगले यशस्वी व्हावे, अशा शुभेच्छा दिल्या. या वेळी प्राचार्य डॉ. संकेत कदम, उपप्राचार्य बाळासाहेब सूर्यवंशी, डॉ. पांडुरंग मोहिते, डॉ. सुनील दिवाळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com