-नैसर्गिक मँगो पल्पच्या तंत्राला युगांडामधून मागणी
-rat२९p२०.jpg-
25N95368
श्रुती कापडी
-rat२९p२१.jpg-
युगांडा देशाच्या कृषिमंत्र्यांशी चर्चा करताना श्रुती कापडी.
---------
नैसर्गिक मँगोपल्पची युगांडातील कृषिमंत्र्यांना भुरळ
श्रुती कापडी यांचे तंत्र; दिल्ली येथील प्रदर्शन, फेलोशिप देण्याची ऑफर
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २९ ः तालुक्यातील कोंडअसुर्डे येथील श्रुती कापडी यांच्या नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या मँगोपल्पची चव युगांडा देशाच्या कृषिमंत्र्यांना खूपच आवडली. युगांडा देशात आंब्यावर प्रक्रिया युनिट सुरू करण्यासाठी श्रुती कापडी यांना ऑफरही दिली तसेच फेलोशिप देण्याचे कबूल करतानाच येथील मँगोपल्प विकत घेण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. कोकणातील ग्रामीण भागात कार्यरत श्रुती यांच्या नैसर्गिक पल्प बनवण्याच्या तंत्राला परदेशातूनही मागणी आली आहे.
दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून कोंडअसुर्डे येथील श्रुती कापडी यांच्या मँगोपल्प प्रकल्पाच्या स्टॉलची निवड झाली होती. नुकत्याच झालेल्या या प्रदर्शनामध्ये नैसर्गिक पद्धतीने बनवलेला आमरस ठेवण्यात आला होता. यामध्ये परदेशातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातील व्यावसायिकही सहभागी झाले होते. जागतिक फळप्रक्रिया युनिट पाहण्यासाठी ३० देशातील प्रमुख मान्यवर दिल्ली येथे आले होते. त्यापैकी पहिल्या दिवशी युगांडा देशातील कृषिमंत्र्यांनी येथील स्टॉलना भेट दिली. तिथे सहभागी झालेल्या स्टॉलधारकांपैकी श्रुती वयाने सर्वात लहान स्टॉलधारक होती. त्याचे त्यांनी कौतुक केले. तिथे श्रुतीबरोबर त्यांनी संवाद साधला. मॅंगोपल्पची चव चाखल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच पुढील वर्षी प्रक्रिया केलेल्या पल्पची मागणीही त्यांनी नोंदवली आहे. युगांडा देशात आंबा लागवड आहे. तिथे आंब्यावर नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया करण्याचे युनिट सुरू करण्याबाबत श्रुती यांनी सूचना केली तसेच फेलोशिप देण्याचीही तयारी दर्शवली. श्रुती यांच्या प्रक्रिया युनिटमधील आमरस कोणतेही केमिकल मिक्स न करता नैसर्गिक पद्धतीने बनवण्यात आला आहे. आंब्याचा रस योग्य वेळेत उकळवणे आणि थंड करणे, त्यात चवीनुसार साखरेचा वापर करणे या बाबींचे सुयोग्य प्रमाण श्रुती यांनी निश्चित केले आहे. त्यामुळे त्यांच्या युनिटमधील आमरसाचा दर्जा चांगला झाला आहे. हीच बाब युगांडा येथील कृषिमंत्र्यांनी विचारून घेतली आणि तिचे कौतुकही केले.
दरम्यान, श्रुती यांच्या संगमेश्वर येथील प्रक्रिया युनिटमध्ये सुमारे ३० ते ४० टन आंब्यावर प्रक्रिया करून सुमारे २० टन आमरस बनवले जाते. त्यांच्या युनिटमधील मॅंगोपल्प दुबई, टर्की, युएस येथील देशात काही प्रमाणात पाठवला जात आहे.
---
...अशी घेतली भरारी
कोंडअसुर्डे येथील सामान्य कुटुंबातील श्रुती कापडी हिने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर शरदचंद्रजी पवार अन्न तंत्रज्ञान विद्यालय खरवते (चिपळूण) येथून २०२२ ला अन्नप्रक्रिया व व्यवसाय अभ्यासक्रमात पदवी घेतली. तत्पूर्वी तिचे वडील अमोल कापडी यांनी आर. के. फ्रूट प्रोसेसिंग या नावाने छोटे युनिट सुरू केले होते. उत्पादनक्षमता फारच कमी होती. ते गॅस युनिट होते. श्रुतीने याची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला. तिला वडिलांचेही पाठबळ मिळाले. केंद्र शासनाच्या पीएसएस योजनेतून अनुदान घेत युनिटचे क्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यात यशही मिळाले.
----
कोट
क्षेत्र कोणतेही असो; पण कष्ट, सातत्य आणि उत्तम नियोजन केले तर कोणत्याही व्यवसायात यश मिळवता येते. महाराष्ट्रातून एकमेव स्टॉल दिल्ली येथील प्रदर्शनात सहभागी झाला होता. तिथे युगांडाच्या कृषिमंत्र्यांबरोबर चर्चा झाली. त्यामुळे भविष्यात काम करण्याचा उत्साह वाढला आहे.
- श्रुती कापडी, कोंडअसुर्डे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.