शिंदे सेनेच्या दसरा मेळाव्यास पाच हजार कार्यकर्ते जाणार

शिंदे सेनेच्या दसरा मेळाव्यास पाच हजार कार्यकर्ते जाणार

Published on

95354

शिंदे सेनेच्या दसरा मेळाव्यास
पाच हजार कार्यकर्ते जाणार

संजू परब ः जिल्ह्यात नियोजन सुरू

सावंतवाडी, ता. २९ ः मुंबई येथील आझाद मैदानावर शिवसेनेचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेनेतर्फे होत असलेल्या दसरा मेळाव्याला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत ५ हजार कार्यकर्ते जाणार आहेत. तसे नियोजन केल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच मिनी विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता हा मेळावा अधिकच भव्य होणार आहे. त्यामुळे राज्यभरातून शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात मुंबईकडे रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातूनही किमान ५ हजार शिवसैनिक मुंबईत जाण्याचे उद्दिष्ट आहे. मतदारसंघातील १७ जिल्हा परिषद व तीन शहरांमधून प्रत्येकी २५० कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत.
मतदारसंघात आमची तयारी पूर्वीपासून आहे. निवडणूक लढण्यासाठी सक्षम आहोत. आमचे नेते आमदार दीपक केसरकर ठरवतील ते मान्य असेल. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करू, असा विश्वासही परब यांनी व्यक्त केला. जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, महिला जिल्हा आघाडी प्रमुख ॲड. नीता कविटकर, वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा संघटक सुनील डुबळे, अर्चित पोकळे, भारती मोरे, हर्षद डेरे, आबा केसरकर, सुजित कोरगावकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com