‘वैश्य समाज’तर्फे १३ टक्के लाभांश

‘वैश्य समाज’तर्फे १३ टक्के लाभांश

Published on

‘वैश्य समाज’तर्फे
१३ टक्के लाभांश
फोंडाघाट ः वैश्य समाज पतसंस्थेमध्ये १३ टक्के लाभांश जाहीर केला आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांसाठी १३ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष गणपत वळंजू, उपाध्यक्ष शेखर कुशे, मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर यांच्या उपस्थितीत ही वार्षिक सभा घेण्यात आली. मागील आर्थिक वर्षाचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार पतसंस्थेची गुंतवणूक ४० कोटी ३२ लाख इतकी झाली आहे. तर संस्थेचे खेळते भाग भांडवल १७२ कोटी ७ लाख रुपये असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष गणपत वळंजू यांनी सभागृहाला दिली. वैश्य समाज पतसंस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर सुरू केला आहे. राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे या पतसंस्थेमध्ये देवाणघेवाणीचे सर्व व्यवहार आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध केले आहेत. दैनंदिन जमा योजनेमध्ये अत्याधुनिक मोबाईल ॲप वापरले जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संस्थेचा आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. आगामी काळामध्ये वैश्य समाज पतसंस्थेचा विस्तार आचरा, रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर व पाचल, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, आजरा या ठिकाणी नवीन शाखा सुरू करून होणार आहे. येत्या मार्च २०२६ पर्यंत दोनशे कोटी ठेवीचे लक्ष संस्थेच्या माध्यमातून ठेवले आहे.
---
पावसाचा जोर
ओसरू लागला
कणकवली ः गेले काही दिवस चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सातत्याने कोसळणाऱ्या पावसाचा जोर हळूहळू ओसरू लागला आहे. दोन दिवसांपासून सूर्याचे दर्शनही होऊ लागले आहे. मात्र, ढगाळ वातावरण कायम आहे. परतीच्या पावसाचे वेळापत्रक यंदा लांबले आहे. चक्रीवादळामुळे पावसाचा जोर गेले आठ दिवस कायम होता. सातत्याने पाऊस कोसळत होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. नदी नाल्यांना पूरसदृश स्थिती कायम होती. शेतशिवारांमध्ये पाणी साचले होते. मात्र, दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर ओसरू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामातील भात शेती परिपक्व होत आहेत. पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शिवारामध्ये पाणी साचल्याने भातशेतीला फटका बसला आहे.
---
शिरोडा येथे रविवारी
कोजागिरी कविसंमेलन
सावंतवाडी ः साहित्य प्रेरणा कट्टा, आजगावच्या सलग साठव्या मासिक कार्यक्रमांतर्गत र. ग. खटखटे ग्रंथालय शिरोडा यांच्या सहयोगाने खटखटे ग्रंथालयात रविवारी (ता. ५) सायंकाळी ६ वाजता कोजागिरी कविसंमेलन आयोजित केले आहे. कोजागरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला होणारे हे कविसंमेलन सर्वांसाठी खुले आहे. कविता स्वरचित असावी किंवा अन्य कविताही सादर करता येतील, पण त्यावेळी मूळ कवीचे नाव सांगणे आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गीतगायन, नाट्यछटा, कथाकथन आदी कलाही सादर करता येतील. कविता सादर करून इच्छिणाऱ्यांनी वा इतर कला सादर करू इच्छिणाऱ्यांनी आपली नावे ३ ऑक्टोबरपर्यंत ग्रंथालयात नोंदवावीत, असे आवाहन दोन्ही संस्थांमार्फत करण्यात आले आहे.

लिपिक पद भरतीसाठी
शनिवारपर्यंत मुदतवाढ
ओरोस ः सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७३ लिपिक पदांची भरती आयबीपीएस या कंपनीमार्फत सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांना ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास मुदत होती. आता ही मुदत वाढविण्यात आली असून उमेदवारांना ४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्यास संधी मिळाली आहे. इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने या भरतीत सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे. जिल्हा बँकेतील ७३ लिपिक पदांच्या या भरतीसाठी आतापर्यंत ३९३५ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत, तर ६७३ उमेदवारांचे अर्ज प्रोसेसमध्ये आहेत. जिल्हा बँकेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना या भरतीत संधी मिळावी, म्हणून ही मुदतवाढ दिल्याचे दळवी यांनी सांगितले. संकेतस्थळावर पात्र उमेदवारांना या भरती प्रक्रियेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची मुदतवाढ उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती दळवी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com