मळगावमध्ये दिव्यांग बालकांना व्हीलचेअर

मळगावमध्ये दिव्यांग बालकांना व्हीलचेअर

Published on

swt307.jpg
N95601
मळगावः येथे आयोजित शिबिरात दिव्यांग बालकांना मोफत व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले.

मळगावमध्ये दिव्यांग बालकांना व्हीलचेअर
शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसादः आरोग्य तपासणीसह आधार-आभा कार्डचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३०ः मळगाव (ता. सावंतवाडी) येथे पार पडलेल्या दिव्यांग शिबिरामध्ये ८ दिव्यांग बालकांना मोफत व्हीलचेअर देऊन मोलाचे सहकार्य केले गेले. कुडाळ तालुक्यातील ओरोस बुद्रुक येथील समेट विधी सेवा केंद्राच्या वतीने हे व्हीलचेअर मोफत उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे यांच्या हस्ते याचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र राज्‍य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत दिव्यांग बालकांची ओळख, तपासणी करण्याकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शनिवारी (ता. २७) सकाळी मळगाव येथील श्री भगवती सभागृह येथे दिव्यांग बालकांच्या सक्षमीकरणासाठी विशेष शिबिर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये समेट विधी सेवा केंद्र, ओरोस बुद्रुक यांच्यामार्फत ८ दिव्यांग बालकांना मोफत व्हीलचेअर देण्यात आल्या. त्याचे वाटप न्यायाधीश डॉ. देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश विद्या देशमुख, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सावंतवाडी तालुका वकील संघ अध्यक्ष बाळाजी रणशूर, न्यायिक अधिकारी, समेट विधी सेवा केंद्रामार्फत अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे सावंतवाडी लायन्स क्लबने मोफत हॉल, तसेच अध्यक्ष, सदस्य, बाल कल्याण समिती सिंधुदुर्ग, रोटरी क्लब सावंतवाडी, तहसीलदार सावंतवाडी व वसुंधरा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टनेरुर यांनी दिव्यांग बालकांसाठी शिबिराच्या ठिकाणी येण्यासाठी विनामूल्य वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव संपूर्णा गुंडेवाडी यांनी प्रस्तावना केली. तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष रंजना कुंभार, सावंतवाडी वकील संघ महिला उपाध्यक्ष ॲड. सिध्दी परब यांनी सुत्रसंचालन केले. ॲड. संकेत नेवगी यांनी आभार मानले.
या शिबिरामध्ये सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा रुग्णालय, आरोग्य विभाग, पोस्ट ऑफिस, नॅब, समेट विधी सेवा केंद्र ओरोस बुद्रुक या सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या सर्व शासकीय शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच दिव्यांग बालक व त्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी दिव्यांग बालकांसाठी मोफत ओळख व तपासणी, आरोग्य तपासणी, आभाकार्ड, आयुष्मान कार्ड, जातीचे दाखले, नेत्र तपासणी व नवीन आधार नोंदणी, आधारकार्ड अद्ययावत करणे तसेच शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबतचे स्टॉल लावले होते. दिव्यांग बालकांना व्हीलचेअरचे व दिव्यांग प्रमाणपत्र व युनिक आयडीचे वाटप करण्यात आले.

चौकट
दिव्यांग बालकांसाठी समन्वयातून प्रयत्न
जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. देशपांडे यांनी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बालक हे शासनाच्या कोणत्याही लाभापासून वंचित राहू नये, याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यांच्या समन्वयाने जास्तीत जास्त प्रयत्न केले जातील, असे सांगितले. या कार्यक्रमामध्ये दिव्यांग बालक, त्यांचे पालक, शिक्षक, शासकीय अधिकारी कर्मचारी असे एकूण ५०० हून अधिक लोक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com