माणसातील संवेदनशीलतेचे जतन हीच खरी सेवा
माणसातील संवेदनशीलतेचे जतन करा
श्रीकांत भारतीय ः १२६१ दत्तक मुलांचे पुनर्वसन
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ३० : आमदार, खासदार हे पाण्यावरचे बुडबुडे आहेत. माणसातील संवेदनशीलता हीच शाश्वत आहे. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार ही संवेदनशीलता जपणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी येथे केले.
भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा वतीने सेवा पंधरवडानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय प्रबुद्ध संवाद या कार्यक्रमात सामाजिक जीवनातील संवेदनशीलता या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, कोणतेही छोटे काम हाती घ्या, पण त्यात सातत्य हवे. अनाथालयातील मुलांना १८ वर्षांनंतर आधार मिळत नाही. या समस्येवर आम्ही सहा वर्षांपासून काम करत आहोत. आतापर्यंत १ हजार २६१ मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पुनर्वसन केले. त्यापैकी पाच जण पोलीस उपनिरीक्षक, ७२ जण पोलीस कॉनस्टेबल, दोन विक्रीकर निरीक्षक झाले असून एक मुलगी नोकरीनिमित्त लंडनला गेली आहे. अनाथालयात वाढलेल्या मुलींच्या विवाहानंतर त्यांना माहेर नसते. या मुलींना माहेरपणाचा अनुभव मिळावा यासाठी पुण्याजवळ माहेरवाशीण सदन उभारण्याचा संकल्प राबवीत आहोत. या मुलींनी चार दिवस तरी माहेरचा उबदारपणा अनुभवावा, अशी संकल्पना आहे, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन सेवा सुशासन समितीचे जिल्हा संयोजक अक्षय फाटक यांनी केले. माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी आमदार भारतीय यांचा परिचय करून दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.