शतक पूर्ण करणाऱ्या साळुंखे आजींचा विशेष सन्मान
rat३०p९.jpg-
२५N९५६१८
रत्नागिरी : शतक पूर्ण करणाऱ्या साळुंखे आजींचा सन्मान करताना सुरेशराव सुर्वे. उपाध्यक्ष प्राची शिंदे, डॉ. अमित बागवे.
----
सुनंदा साळुंखे यांचा शंभराव्या वर्षी सन्मान
क्षत्रिय मराठा मंडळ; संगीत दिग्दर्शक प्रणिल देसाईंचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : वयाची शंभर वर्षे पूर्ण केलेल्या सुनंदा विष्णू साळुंखे यांचाही सत्कार सर्वांना भावला. आजींची ठणठणीत प्रकृती व खडा आवाज ऐकून सर्वांनी उभे राहून अभिवादन केले. तसेच द फर्स्ट फिल्म या पहिल्या चित्रपटासाठी सर्वोच्च संगीत दिग्दर्शक म्हणून रजत कमल हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पोचरी गावचे सुपुत्र प्रणिल देसाई यांच्यासह विविध क्षेत्रात अव्वल कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार क्षत्रिय मराठा मंडळातर्फे करण्यात आला.
अंबर हॉलमध्ये मंडळाच्या अठराव्या वर्धापनदिनी सन्मान सोहळा झाला. वर्धापनदिन विशेषांकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण मान्यवरांनी केले. हे मुखपृष्ठ सदानंद संभाजी भोगले या कलाकाराने साकारले असून त्यांचाही सन्मान केला. या वेळी अनन्या कदम (गणित अॅप निर्मिती), सेजल पाटील (एमबीबीएस), साईश्री नलावडे (हॅंडबॉलमध्ये प्रावीण्य), दुर्वा देसाई (मशीन लर्निंग इंजिनिअर), आदित्य पाटील (फुटबॉल जर्मनीत निवड), साईप्रसाद साळवी (सीए), वरद साळवी (ऑलिंपियाडमध्ये चौथा क्रमांक.), राजेंद्र सावंत (राष्ट्रपती पोलिस पदक), महेश बने (२५ वर्षे फेटा बांधणी), विनायक खानविलकर (संस्कृती, सामाजिक कार्य), नेत्रा राजेशिर्के (मुख्याध्यापिका), विजय शिंदे (हिमोफिलिया सोसायटी), गौरी सावंत (बॅचरल ऑफ फिजिओथेरपी), महेश मिलके (राष्ट्रीय जलतरणपटू), आयुष काळे, योगेंद्र तावडे, सानवी पवार, श्रावणी सावंत, हर्षल सावंत, रुद्र दरेकर, रुद्र सरफरे (सर्वांना जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक), करण मिलके व तनया मिलके (विद्यापीठ जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक), ऐश्वर्य सावंत (राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत राज्यात प्रथम), दिग्विजय चौगुले (राष्ट्रीय रायफल शुटिंगमध्ये कास्यपदक), श्रेया तळेकर (बी. टेक), प्रभात निकम (एमबीए), जिया चव्हाण (जिल्हास्तरीय रायफल शूटिंगमध्ये सुवर्णपदक), सानवी देसाई (जिल्हास्तरीय एअर रायफल शूटिंग सुवर्ण), तन्वी सावंत (मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात एकपात्री अभिनय रौप्यपदक) यांना गौरवण्यात आले.
चौकट १
गुणवंत विद्यार्थी
शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थी दुर्वा चव्हाण, परी शिंदे, अन्वेद देसाई, निधी सावंतदेसाई, ओजस शिंदे, सीमंतिनी देसाई, श्रेया मोरे, तन्वी शिंदे, शिवम शिंदे, तन्वी शिंदे, सीईटीतील गुणवंत विवेक पवार, हर्ष लोटणकर, जुई देसाई, स्वरा साळवी, आर्यन सावंत, अभिषेक पाटील, आर्या साटम आणि विराज चाळके यांना गौरवण्यात आले. राज्यस्तरीय द्रोणाचार्य जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या त्रिशा भुजबळराव या विशेष विद्यार्थिनीचा सन्मान करण्यात आला. अन्वयी कदम (स्केटिंगमध्ये यश), विराज सावंत (अबॅकस), चिन्मय सावंत (गोवा अॅबॅकस ट्रॉफी) या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.