मालवणचा दांडी किनारा झाला चकाचक

मालवणचा दांडी किनारा झाला चकाचक

Published on

95682
मालवण-दांडी ः श्री पंचम खेमराज महाविद्यालयातर्फे राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांसोबत लखमराजे भोसले व अन्य.

मालवणचा दांडी किनारा झाला चकाचक

स्वच्छता मोहीम; ‘पंचम खेमराज’तर्फे टनभर कचऱ्याचे संकलन

सकाळ वृत्तेसवा
सावंतवाडी, ता. ३० ः सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभागातर्फे मालवणच्या दांडी किनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय किनारे स्वच्छता दिनाचे औचित्य साधून भव्य स्वच्छता मोहीम राबविली. राष्ट्रीय तटीय अनुसंधान केंद्र, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित या अभियानात सुमारे ८० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत दांडी बीचवरील अर्धा किलोमीटर परिसरातून एक टनापेक्षा जास्त प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा केला.
​​दांडी येथील दांडेश्वर मंदिराच्या परिसरापासून सोमवारी (ता. २९) सकाळी साडेआठ वाजता या स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. उपक्रमाचे उद्‍घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त व मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी लखमराजे यांनी, मालवणसारख्या पर्यटनस्थळी किनाऱ्यांची स्वच्छता राखणे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
अभियानात श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचे एनसीसी (आर्मी, नेव्ही व आर्मी गर्ल्स) आणि एनएसएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनसीसी विभागाचे डॉ. सचिन देशमुख, डॉ. विशाल अपराध, डॉ. कविता तळेकर, एनएसएस विभागाचे समन्वयक डॉ. यू. सी. पाटील, डॉ. सुनयना जाधव आदी उपस्थित होते. ​या सोबतच मालवण नगरपरिषद आरोग्य विभागाचे संजय पवार, मेगल डिसोजा (युथ बीट्स फॉर क्लायमेट), माजी वनअधिकारी सुभाष पुराणिक, सत्यवान सुतार (कांदळवन विभाग), सुनील सावंत (मंडल अधिकारी), यू.एन.डी.पी. (केदार पालव व टीम), सोनाली परब (नीलक्रांती) आणि दांडी येथील स्थानिक नागरिक तसेच इकोमेट संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. स्वच्छता अभियानाचे समन्वयक डॉ. गणेश मर्गज यांनी प्रास्ताविक केले.
---
जमा कचरा नगरपरिषदेकडे सुपूर्द
​​स्वच्छता मोहिमेत जमा केलेला प्लास्टिक, मेटल, काच आणि कागद असा १ टनाहून अधिक कचरा पुढील प्रक्रियेसाठी मालवण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द केला. अभियानाच्या माध्यमातून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व, कचऱ्यामुळे पसरणारी रोगराई, समुद्रातील जीवांवर होणारा परिणाम आणि पर्यटनावरील होणारा परिणाम याची माहिती देऊन सामाजिक भान व जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. माजी वनअधिकारी सुभाष पुराणिक यांनी लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
​​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com