ओटवणेचा दसरोत्सव आजपासून
95736
ओटवणेचा दसरोत्सव आजपासून
ओटवणे, ता. ३० ः सुमारे ४७५ वर्षांची सावंतवाडी राजकीय संस्थानाची ऐतिहासिक परंपरा लाभलेला ओटवणे दसरोत्सव उद्या (ता. १) व गुरुवारी (ता. २) साजरा होत आहे.
राजेशाही सण म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या सोहळ्यासाठी सुवर्णरुपी देवाची तिन्ही तरंगे, भरजारी वस्त्राचा साज आज वाजतागाजत ओटवणे गावात आणण्यात आला.
येथील श्री देवी सातेरी रवळनाथ पंचायत देवस्थानाचा वार्षिक दसरोत्सव म्हणजे सोन्या-चांदीच्या लख्ख प्रकाशाने नेत्रांना आगळीवेगळी अनुभूती देणारा सुवर्ण सोहळा होय. खंडे नवमी व दसरा या दोन दिवशी साजरा होणाऱ्या या सोहळ्यात श्री देवी कायकायी, श्री देवी पावणाई आणि श्री देव कुळाचा पूर्वज ही तीन तरंगे सोन्याच्या मुखवट्याने आणि भरजरी वस्त्राने मढवली जातात. दसरोत्सवात या देवस्थानच्या देवतांना भरजरी वस्त्रांसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा साज चढवण्याची प्रथा आहे. या देवस्थानची तिन्ही तरंगे सोन्याची आहेत. सावंतवाडी महसूल खात्याच्या उपकोषागारात असलेला हा ऐतिहासिक सोनेरी ठेवा आज दुपारी मंदिरात आणला गेला.
सावंतवाडी देवस्थानच्या उपकोषागारात असलेला हा ऐतिहासिक राजकीय ठेवा या उत्सवाच्या आदल्या दिवशी गावात आणला जातो. हा विलक्षण साज आणि गाव राहाटीतील धार्मिक परंपरा पाहण्यासाठी जिल्ह्यातील हजारो भाविकांसह गोवा, बेळगाव कोल्हापूर परिसरातून भाविक या सोहळ्याला उपस्थिती दर्शवतात. या सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ओटवणे देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.