अतिवृष्टीत शेतीचे नुकसान, भरपाई जाहिर करा
rat30p39.jpg
95780
मंडणगड: तहसिलदार अक्षय ढाकणे यांच्याकडे निवेदन सादर करताना शेतकरी सौरभ घोसाळकर व सहकारी.
rat30p40.jpg
95782
देव्हारे : पावसामुळे उभे पिक आडवे झाले आहे.
-----------
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करा
मंडणगड तहसीलकडे मागणी; कृषी विभागाकडून पंचनामे सुरू, भात उत्पादन घटणार
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३०ः सप्टेंबरमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने खरीप हंगामातील भात, नाचणी, वरी या हाताशी आलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यापोटी शेतकऱ्यांना शासनाने तातडीने नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी मंडणगड येथील प्रगतशील शेतकरी सौरभ घोसाळकर यांनी मुख्यमंत्र्यांना देण्यासाठीचे निवेदन तहसील कार्यालयाकडे सुपूर्द केले आहे.
तहसीलदार अक्षय ढाकणे यांच्याकडे हे निवेदन दिले. तालुक्यात मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतातील भात, नाचणी, वरी या प्रमुख पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकावर बुरशी लागून रोग पडला आहे. परिणामी उत्पादनात घट झाली असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. सध्या भात कापणीस आलेले असताना पाऊस पडत असल्याने पीक हातातून निघून जाण्याची भिती व्यक्त होत आहे. या संदर्भातील पिकांचे नमुने सादर करताना नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करुन अहवाल शासन दप्तरी ठेवण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी शैलेश घोसाळकर, सुभाष दळवी, शिवंम दळवी, नयन खैरे उपस्थित होते.
कोट
गतवर्षी जिल्ह्यात १२५ टक्के पाऊस पडला. यंदा सरारीच्या ९५ टक्के पाऊस झाला आहे. मान्सुनने मुक्काम लांबणार असल्याने पावसाच्या अनियमेतचा फटका पिकांना बसत आहे. राज्यशासनाने यंत्रणेच्या माध्यमातून पिक नुकसानीचा अहवाल तयार करुन तातडीने मदत जाहीर करावी.
- सौरभ घोसाळकर, शेतकरी
कोट २
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १० हेक्टरमध्ये १०० शेतकरी बाधीत झाल्याचा अंदाज आहे. कृषि विभागाचे कर्मचारी नुकसानीचे पंचनामे करीत आहेत. आकडेवारी वाढीची शक्यता आहे.
- सोमनाथ अहिरकर, तालुका कृषि अधिकारी.
चौकट
तालुक्यातील लागवड क्षेत्र
* भात २४०० हेक्टर
* नाचणी १२० हेक्टर
* वरी ५ हेक्टर
* तुर २५० हेक्टर
* भाजीपाला १५० हेक्टर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.