मासेमारीसह लाखोंची उलाढाल ठप्प

मासेमारीसह लाखोंची उलाढाल ठप्प

Published on

95783

मासेमारीसह लाखोंची उलाढाल ठप्प

वादळाचा फटका; हवामान विभागातर्फे सतर्कतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३० : मासेमारी हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात यावर्षीही मच्छीमारांना समुद्रातील वादळसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. परिणामी मासेमारी ठप्प झाली असून लाखोंची उलाढाल पूर्णतः थांबली असल्याचे चित्र जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात दिसून येत आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पुढील २४ तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. किनारपट्टी भागात ४९ ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची तसेच वाऱ्याच्या वेगात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंदरावर तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी केले आहे.
यावर्षीच्या मासेमारी हंगामाची सुरुवात खडतरच झाली आहे. मधल्या काळात स्थानिक मच्छीमारांना मोरी, बांगडा, सुरमई, तारली यांसारखी मासळीची चांगली ''कॅच'' मिळाली; मात्र गेले महिनाभर समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून किनारपट्टी भागात मुसळधार पाऊसही कोसळत आहे. त्यामुळे अनेक ट्रॉलर देवगड बंदरात सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहेत. समुद्रातील वादळसदृश स्थितीचा मोठा फटका मासेमारीस बसला आहे.
किनारपट्टी भागात वाऱ्याचा जोर वाढत असल्याने पारंपरिक मच्छिमारांनी आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी हलविल्या आहेत. ऐन हंगामात समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याने मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील समुद्रातील मासेमारी ठप्प झाली असून लाखो रुपयांची उलाढाल थांबली आहे. समुद्रातील वादळसदृश परिस्थिती निवळण्याची वाट मच्छीमारांना पाहावी लागणार असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com