सदर

सदर

Published on

संतांचे संगती नवरात्र विशेष----------लोगो
(२८ सप्टेंबर टुडे ३)

आता वंदु वेदमाता | श्रीशारदा ब्रह्मसुता|
शब्दमुळ वाग्देवता | माहंमाया‌||
समर्थ श्रीरामदास स्वामींनी आपल्या दासबोध ग्रंथातील शारदास्तवनाचा प्रारंभ या ओवीने केला आहे. त्या श्रीभगवतीला श्रीसमर्थ रामदासस्वामींनी वेदमाता, वाणीची देवता, महामाया अर्थात आदिमाया असे संबोधले आहे.
rat१p८.jpg-
25N95892
- धनंजय चितळे
----
शक्ती म्हणजेच आदिमाया...

श्रीभगवंतांची कार्य करणारी शक्ती म्हणजे ही आदिमाया होय. ती काय करते ते सांगताना श्रीसमर्थ म्हणतात,
जे अनंत ब्रह्मांडे घडी | लीलाविनोदेची मोडी |
आपण आदिपुरुषी दडी | मारोनी राहे ||
जी अनेक ब्रह्मांडे तयार करते सहज गंमतीने मोडून टाकते, ती स्वतः श्रीभगवंतांच्या अंतरात दडी मारुन राहते. या श्रीभगवतीचे कार्य सांगताना श्रीरामकृष्ण परमहंस यांनी एक गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात, एका माणसाकडे लग्न असते. आलेल्या पाहुण्यांची सर्व व्यवस्था घरातील यजमान पत्नी पाहत असते. यजमान फक्त स्वागत करतो. पण सर्व कार्यक्रम पूर्ण झाला की कौतुक मात्र यजमानाचे अर्थात पुरुषाचे होते. परमहंस असे म्हणतात, हे विश्व ती आदिमाया चालवते पण, सर्वजण म्हणतात या जगाचा चालक परमात्मा आहे ! एका आरतीत हाच भाग सांगितला आहे.
निर्गुण जे होते, ते सगुण त्वां केले
चराचर हे अवघे तुजपासुनि झाले
मायोवेष्टित जन हे ऐसे त्वां केले
त्रैलोक्यहि आपुल्या ऐसे त्वां केले ||१||
जयदेवी जय देवी जय आदिशक्ती
आरती ओवाळून तुज एकाग्र भक्ती ||ध्रुव||
ऐसे सगुणे तुजला लेणी जडितांची
अनेक वस्त्रे शोभती कांचन वर्णांची
बैसुनि सिंहासनी नृत्ये गणिकांची
पाहसी तू नयनी जननी जनकाची ||२||
हरिहरब्रह्मादिकही येती नवसांसी
जे जे वर मागसी ते ते तू देसी
कृपाळू अंबे माते पावसि भक्तांसी
परशुराम दीन करुणाकर होसी ||३||

या आदिमाया जगदंबेची अखंड सेवा घडावी आणि तिच्या करुणा कृपेने नित्य भक्ती मार्गावर वाटचाल होत राहावी अशीच प्रार्थना करुन नवरात्र विशेष ह्या विषयाला विराम देऊया. नवरात्राच्या काळात जागरण करणाऱ्या श्रीजगदंबेला विश्रांती घ्यावी अशी प्रार्थना करतो.
सौम्य शब्दे उदोकारे वाचे उच्चारा
भावे भक्त विनवी शांती चला मंदिरा ||ध्रुव||
नवखणांचा पलंग शांते शोभतो बरा
सुमनांचे परिवारी शांते शयन करा ||१||
अष्टहि भोग भोगुनी शांता पहुडली शेजे
भक्तजनांची आज्ञा जाहली चलावे सहजे ||२||
मानस सुखी दशम स्थाने निद्रा हो केली
रामदास म्हणे शांता ध्यानी राहिली ||३||
||उदयोऽस्तु जगदंब जगदंब||
(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com