जमिनच खरे सोने, मूल्य ओळखून हित साधा
95979
95980
जमिनच खरे सोने, मूल्य ओळखून हित साधा
मनीष दळवी ः वेर्लेतील शेतकरी मेळाव्यात तरुणांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः कमी पगाराच्या शहरातील नोकऱ्यांच्या मागे न लागता, आपल्याकडे असलेले खरे सोने म्हणजे तुमची जमीन आणि शेती याचे मूल्य ओळखून तरुणांनी स्वतःचे हित साधावे, असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले. वेर्ले येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
तालुक्यातील वेर्ले विकास संस्था, शिरशिंगे विकास संस्था आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता. ३०) शेतकरी संवाद मेळावा उत्साहात पार पडला. श्री. दळवी आणि जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांच्या संकल्पनेतून हा मेळावा आयोजित करण्यात आला. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि बँकेच्या माध्यमातून त्यांचे निराकरण करणे, हा मेळाव्याचा मूळ उद्देश होता. प्रास्ताविक भाषणात मडगावकर यांनी, जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खाते आणि शेती खाते यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या आरोग्याच्या समस्या, आयुष्मान योजना याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली. शेती खात्याच्या विविध सबसिडी आणि नवीन योजनांबद्दल शेतकऱ्यांना सजग केले. त्यांच्या समस्यांवर योग्य ते उपाय सुचवले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत उपलब्ध असलेल्या डिजिटल सेवा, बचतीचे महत्त्व आणि कर्ज योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या एटीएम कार्डचे वितरण करण्यात आले.
वेर्ले येथे मेळाव्यास सैनिक बँकेचे चेअरमन बाबुराव कविटकर, सीईओ सुनील राऊळ, वेर्ले विकास सोसायटीचे अध्यक्ष विजय राऊळ, सरपंच रुचिता राऊळ, उपसरपंच मोहन राऊळ, दिलीप राऊळ, विलास राऊळ, शिवा राऊळ, लाडजी राऊळ, बाबा राऊळ, भगवान राणे, पुंडलिक कदम, प्रसाद गावडे, राजन राणे, सुभाष राऊळ आदींसह शेतकरी वर्ग उपस्थित होता. सूत्रसंचालन शंकर पावसकर यांनी केले. शिरशिंगे येथे सरपंच दीपक राऊळ, सोसायटीचे अध्यक्ष दिलीप राणे, उपाध्यक्ष रघुनाथ परब, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष नारायण राऊळ, सुरेश शिर्के, पांडुरंग राऊळ, गणपत राणे, प्रशांत देसाई आदी उपस्थित होते.
---
पर्यटनपूरक, दुग्ध व्यवसायावर भर द्या!
मेळाव्याचे अध्यक्षस्थान जिल्हा बॅंक अध्यक्ष दळवी यांनी भूषविले. यावेळी त्यांनी पर्यटनपूरक आणि दुग्ध व्यवसायावर भर देण्याचे आवाहन केले. तरुण शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे. या व्यवसायासाठी लागणारे आर्थिक पाठबळ कर्ज स्वरुपात बँकेमार्फत उपलब्ध केले जाईल. तसेच प्रशिक्षणाची सोयही उपलब्ध करून देता येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्ह्याच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत चांगल्या प्रतीचे बँकिंग पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.