-चिपळूण-पोफळी रस्ता खड्ड्यात
-rat१p२४.jpg-
२५N९५९९०
चिपळूण ः पेढांबे पूल येथील रस्त्यावर पडलेले खड्डे.
----
चिपळूण-पोफळी मार्ग धोकादायक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ ः पावसाने चिपळूण-पोफळी मार्गाची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही ठिकाणी भरलेले खड्डे पावसामुळे पुन्हा उखडले गेले आहेत.
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळी ते पोफळीपर्यंतचा रस्ता खड्डेमय बनला आहे. जागोजागी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यातील खड्ड्यांमुळे दररोज लहान मोठ्या अपघातांची मालिका सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, अशी भावना वाहनधारकांतून व्यक्त होत आहे. पेढांबे फाटा येथील दोन्ही पुलावर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. मुंडे येथील शासकीय रोपवाटिकेसमोर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. येथे रात्री वीज नसते. पावसामुळे खड्ड्यामध्ये पाणी साचलेले असते. त्यामुळे रात्री त्यात वाहने आदळतात आणि अपघात होतो. तशीच अवस्था पोफळी येथे ठीक ठिकाणी झाली आहे. येथील सय्यद वाडीत माध्यमिक शाळेसमोरच मोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणचे खड्डे बांधकाम विभागाने भरले होते. ते दोन दिवसात पुन्हा उखडले.
----
कोट
दसऱ्याला अनेकजण नवीन वाहने घेतात. मात्र रस्त्यांची अवस्था पाहून नवीन गाडी घ्यायची की नाही असा अनेकांना प्रश्न पडला आहे. सध्या इलेक्ट्रीक दुचाकीला मागणी जास्त आहे. पण ही वाहने रस्त्यावर टिकणार की नाही असा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवताना दुचाकीचा अपघात होतो. मोठी वाहने खड्ड्यात घातल्याशिवाय पर्याय उरत नाही. पावसाळा सुरू झाल्यापासून वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हे खड्डे भरावेत.
- प्रशांत कदम, नागरिक, शिरगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.