कोकण
निधन
-rat१p२३.jpg--
२५N९५९८९
बाजीराव तावडे
----
बाजीराव तावडे यांचे निधन
चिपळूण : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी बाजीराव तावडे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांनी चिपळूण शहरातील क्रीडा क्षेत्राला मोलाची साथ दिली. ९०च्या दशकातील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या संयोजनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
रत्नागिरीवरून बदली होऊन चिपळूणमध्ये आल्यानंतर तावडे यांनी स्थानिक क्रीडा क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला. चिपळूण तालुका कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. माजी आमदार बापू खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्यस्तरीय सीझन बॉल क्रिकेट स्पर्धेत संयोजनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली. उत्तम यष्टीरक्षक म्हणून त्यांची क्रिकेटमधील ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.