निकम विद्यालयात भोंडला स्पर्धा

निकम विद्यालयात भोंडला स्पर्धा

Published on

-rat१p६.jpg-
२५N९५८९०
सावर्डे : भोंडला स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी व शिक्षक.
---

निकम विद्यालयात भोंडला स्पर्धा
सावर्डे ः गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालयात येथे सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमानिमित्त भोंडला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सकाळ सत्रात सातवी ड ने प्रथम, द्वितीय क्रमांक सातवी क यांनी पटकावला. दुपार सत्रात प्रथम क्रमांक आठवी अ, द्वितीय क्रमांक आठवी ड व तृतीय क्रमांक नववी ड यांना मिळाले. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षिका शिल्पा राजेशिर्के यांच्या हस्ते देवी सरस्वतीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानिमित्त दूर्वा मोरे, जानवी दिंडे, श्रावणी राठोड, प्रीती घाणेकर व साक्षी गोरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थिनींनी भारतीय संस्कृतीतील सरस्वती पूजनाचे महत्त्व, ज्ञानदेवतेचे स्थान तसेच वसंत पंचमीचे महत्त्व स्पष्ट केले. शिल्पा राजेशिर्के यांनी सरस्वती पूजन व साडेतीन शक्तिपीठांबाबत सखोल माहिती दिली. दोन्ही सत्रात ये हंसावरती बसून शारदे ही प्रार्थना सर्व विद्यार्थ्यांनी गायली.

ओंकार मित्रमंडळाकडून २६ हजारांची मदत
चिपळूण ः शहरातील ओंकार मित्रमंडळाने पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मंडळाने २६ हजारांचा आटा (पिठाचे पाकीट) पूरग्रस्तांना दिले. या मदतीच्या रकमेसाठी लागणारा निधी चिपळूणचे उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, माजी अध्यक्ष संजय चिपळूणकर, उपाध्यक्ष पवार, सहसचिव अक्षय केदारी, सल्लागार संदीप चिपळूणकर, मंगेश पेढांबकर आणि विजय उतेकर उपस्थित होते.

शिरगाव आरोग्य केंद्रातील प्रश्न सुटणार
चिपळूण ः शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या सोडवण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते सूरज शिंदे याला दिले. श्री. शिंदे यांनी मुंबईत मंत्री प्रकाश आबीटकर यांची भेट घेतली. आमदार शेखर निकम यांनी ही भेट घडवून आणली. यावेळी शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या आरोग्य केंद्रात ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय श्रेणीवर्धन प्रकरण अंतिम कार्यवाहीसाठी आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडे पाठविण्याची सूचना त्यांनी केली. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा अंतर्गत १०८ रुग्णवाहिका शिरगाव केंद्राला तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आरोग्य केंद्रात एक्स-रे मशीन आणि टेक्निशियन उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. लॅब टेक्निशियन व पी. एम. कटर ही दोन अत्यावश्यक पदे ९ वर्षांपासून रिक्त आहेत, ती तत्काळ भरण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले.

सॉफ्ट टेनिस स्पर्धेत पोफळी शाळेचे यश
चिपळूण ः डेरवण येथे जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा झाल्या. या स्पर्धेमध्ये पोफली न्यू इंग्लिश स्कूलने घवघवीत यश प्राप्त केले. अनुष्का कदम, श्रुती पवार, आर्या उतेकर यांनी उत्कृष्ट खेळ करून विजय संपादन केला. या खेळाडूंची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली. सर्व यशस्वी खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक प्रदीपकुमार यादव यांचे मार्गदर्शन लाभले. या संघाबरोबर व्यवस्थापिका म्हणून सौ. पवार यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com