राजापूर-टिपरी नृत्य स्पर्धेत शीळचे नृत्य पथक प्रथम

राजापूर-टिपरी नृत्य स्पर्धेत शीळचे नृत्य पथक प्रथम

Published on

rat1p26.jpg
96013
राजापूरः पारंपरिक टिपरी नृत्य स्पर्धेतील विजेत्या नृत्य पथकांसमवेत राजापूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन पाडावे, नायब तहसीलदार दीपाली पंडित, नंदकुमार पुजारे आदी.
----------
टिपरी नृत्य स्पर्धेत
शीळचे नृत्य पथक प्रथम
राजापूर, ता. १ः राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने (कै.) प्रकाश कातकर यांच्या स्मरणार्थ आयोजित पारंपरिक टिपरी नृत्य नृत्यकलेचा अविष्कार साऱ्यांना अनुभावयला मिळाला. ढोलकीच्या ठेक्यावर तालबद्द नृत्याला सुरेल आवाजाची मिळालेल्या साथीने रंगलेल्या स्पर्धेत शीळ गोंडाळवाडी नृत्य पथकाने प्रथम क्रमांक पटकाविला. हनुमान प्रसन्न खांबलवाडी-धोपेश्‍वर आणि गणपती ठाणेश्‍वर गोठीवरे-सागवे या पथकांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटाकाविले. महालक्ष्मी कणेरीवाडी-उन्हाळे या पथकाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.
उन्हाळे येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये झालेल्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये सर्व विजेत्या संघांना रोख रकमेसह आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले. राजापूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन पाडावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला नायब तहसीलदार दीपाली पंडित, श्री महालक्ष्मी गंगातीर्थ विकास मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार पुजारे, शाहीर पिलाजी लोळगे, शाहीर सचिन हातणकर, अनिकेत कातकर, गावकार प्रकाश सोडये, गणपत सोडये, अ‍ॅड. सारीका लोळगे, अ‍ॅड. निखिल तेरवणकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेत सहभागी झालेल्या नृत्यपथकांसह नवलादेवी शीळ, श्रीगणेश कृपा अणसुरे बाकाळे, श्री महालक्ष्मी सोडयेवाडी या पथकांना सहभागाबद्दल स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. यानिमित्ताने विविध क्षेत्रामध्ये ठसा उमटविणाऱ्या महिलांसह उन्हाळे गाव आणि परिसरातील शाहीरांचा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com