साडवली-राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा

साडवली-राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा

Published on

rat3p13.jpg
96094
एनएसएससंबंधीच्या माहितीचा व्हिडिओ पाहताना उपस्थित विद्यार्थी.

आठल्ये-सप्रे कनिष्ठ महाविद्यालयात
राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा
साडवली, ता. ३ः देवरूख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ‘एनएसएस लक्ष्य गीत’ व ‘हम होंगे कामयाब’ या प्रेरणादायी गीतांनी झाली. या गीतांनी सभागृहात देशसेवेची जाणीव आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले. यानंतर विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व्यक्त करत एनएसएस विभागात सहभागी होण्यामागील कारणे, सहभागानंतरचा अनुभव आणि समाजसेवेचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतांमधून सेवा, शिस्त आणि समाजाप्रती जबाबदारीची एनएसएसमधून अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त केली. या व्हिडिओतून एनएसएसची उद्दिष्टे, युवकांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आणि सामाजिक बदलासाठी युवाशक्तीची गरज व ताकद याबाबतची प्रभावी माहिती विद्यार्थी स्वयंसेवकांना मिळाली. या कार्यक्रमाला बहुसंख्य प्राध्यापक, एनएसएस स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या एनएसएस दिवसाच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, स्वच्छता, शिस्त आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देण्याचा प्रयत्न यशस्वीपणे साध्य झाला.

Marathi News Esakal
www.esakal.com