पालकांनो, चुकीचा आहार, वाढतात आजार
96176
पालकांनो, चुकीचा आहार, वाढतात आजार
कल्पना आंबवले ः जामसंडेत पालक मेळाव्यात बाहेरील पदार्थ टाळण्याचा सल्ला
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ ः जीवनात आहाराला अधिक महत्त्व असते. चुकीच्या खाण्याच्या पद्धतीमुळे आरोग्याच्या तक्रारीत वाढ होते. प्रकृती स्वास्थ्यासाठी आहारासह बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळले पाहिजे, असे मत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या रत्नागिरी येथील मुख्यसेविका कल्पना आंबवले यांनी जामसंडे येथे व्यक्त केले. मधुमेह आणि लठ्ठपणा टाळण्यासाठी साखर आणि तेलयुक्त पदार्थ खाणे वर्ज्य केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी-सिंधुदुर्ग (नागरी) अंतर्गत पालक मेळाव्यात आंबवले बोलत होत्या. ‘पालक कुटुंब व समुदायाचे सक्षमीकरण’ या अनुषंगाने जामसंडे येथील सांस्कृतिक भवनमध्ये शून्य ते ३ वयोगटातील बालकांच्या विकासासाठी पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी मंचावर उपनगराध्यक्षा मिताली सावंत, नगरसेविका मनिषा जामसंडेकर, नगरसेविका स्वरा कावले, ग्रामपंचायत अधिकारी प्रांजल शेडगे, भाजप शहराध्यक्ष वैभव करंगुटकर आदी उपस्थित होते.
मेळाव्याचे उद्घाटन उपनगराध्यक्षा सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी मुख्यसेविका आंबवले यांनी बालकांचा आहार या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
यावेळी मिताली सावंत, वैभव करंगुटकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला अंगणवाडीसेविका कल्याणी अदम, अदिती केळकर, नयना मेस्त्री, अंकिता कावले, उल्का बिर्जे, रूचिरा कुळकर्णी यांच्यासह अन्य उपस्थित होते. मेळाव्यात ८ गर्भवती आणि ७ स्तनदा मातांचा समावेश होता. यातील काहींचे प्रातिनिधीक स्वरूपात स्वागत झाले. अंगणवाडीच्या मुलांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. त्याला उपस्थितांकडून प्रतिसाद मिळाला. मदतनीस श्रीशा नाटेकर यांनी सूत्रसंचालन केले. सोनाली जाधव यांनी आभार मानले.
---
मुलांच्या आरोग्य वाढीकडे लक्ष द्या!
आंबवले म्हणाल्या, ‘‘मानवाचे जीवन आहारावर चालते. अलिकडे घरचे कमी आणि बाहेरचे जास्त खाणे होत असल्याने आजारांमध्ये वाढ झाली आहे. यातून मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग यासारखे आजार डोके वर काढतात. यामुळे आरोग्याची घडी विस्कटते. बाहेरील खाद्यपदार्थांमुळे पैसे खर्च करून आरोग्य अडचणीत सापडते. बाजारातील केमिकलयुक्त खाण्याने आरोग्याची हानी होते. लहान मुलांमध्ये मधुमेह, लठ्ठपणा जाणवतो. चुकीच्या खाण्याच्या पद्धतीने आरोग्य धोक्यात येते. लठ्ठपणा आणि मधुमेहापासून लांब राहण्यासाठी साखरेला दूर ठेवा. आरोग्याच्या वाढत्या समस्यांमुळेच आता आहाराकडे लक्ष दिले जात आहे. मातांनी आपल्या मुलांच्या आरोग्य वाढीकडे लक्ष देण्याची गरज आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.