चिपळूण-लोकांनी आग्रह केला तरच निवडणूक लढविणार
लोकांनी आग्रह केला तरच निवडणूक लढवणार
रमेश कदम; चिपळूण पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक
चिपळूण, ता. ३ः सामाजिक व राजकीय जीवनातून निवृत्त कधी व्हायचे, हे आपण ठरवत नाही. ते जनतेने व कार्यकर्त्यांनी ठरवायचे असते. जर लोकांनी आग्रह केला तर मी पुन्हा निवडणूक लढवेन, असे विधान माजी आमदार रमेश कदम यांनी केले. चिपळूण पालिका व पूज्य गांधी प्रतिष्ठान यांच्यावतीने गांधारेश्वर येथे महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात ते बोलत होते.
गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शहरातील स्वच्छता, आरोग्य व प्लास्टिकमुक्त मोहिमेबाबत त्यांनी चिपळूण पालिकेच्या कार्याची प्रशंसा केली. सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे आज चिपळूण शहर निरोगी व स्वच्छ आहे. पालिका नियमितपणे घरोघरी जाऊन कचरा संकलन करत आहे, हे विशेष आहे; मात्र काही नागरिक अजूनही रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात. अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंद्रथ खताते, चिपळूण अर्बन बँकेचे माजी संचालक सतीशअप्पा खेडेकर, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक होमकळस, सुरेश राऊत, आरोग्य विभागाचे सुजित जाधव, पाणीपुरवठा विभागाचे रोहित खाडे, निवेदक शिक्षक प्रकाश गांधी आदी उपस्थित होते. या वेळी परीक्षक हसन मुसा, गिरीराज पांडे, विनायक बांद्रे आणि शरयू इंदुलकर यांचा सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.