राजापूर-राजापुरात नवव्यांदा होणार महिला सभापती
राजापुरात नवव्यांदा होणार महिला सभापती
निवडणुकांचे पडघम ; नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ ः गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. पंचायत समितीच्या सभापतिपदाची आरक्षण सोडत नुकतीच झाली. त्यामध्ये राजापूरचे सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे राजापुरात पुन्हा महिलाराज येणार आहे.
अरबी समुद्रापासून थेट घाटमाथ्याच्या पायथ्यापर्यंत विस्तारलेल्या राजापूर तालुक्यामध्ये २३८ गावांचा समावेश आहे. ब्रिटिशकालीन इतिहासाची पार्श्वभूमी लाभलेल्या राजापूर तालुक्याचा कारभार पाहण्यासाठी पंचायत समितीची निर्मिती झाली. त्यापूर्वी सुमारे पंधरा वर्ष तालुक्याचा कारभार लोकल बोर्डातर्फे चालवला गेल्याची माहिती काही बुजुर्गांकडून दिली जाते. या पंचायत समितीचे पर्यायाने तालुक्याचे पहिले सभापती होण्याचा मान (कै.) वामन वासुदेव सप्रे यांना मिळाला. १ मे १९६२ मध्ये पदभार स्वीकारलेल्या सप्रे यांनी पाच वर्ष सभापतिपद भूषवले.
राजापूर पंचायत समितीच्या आजवरच्या इतिहासामध्ये तब्बल आठ महिलांनी सभापतिपद भूषवले आहे. त्यामध्ये प्रतिभा गुरव (१४ मार्च १९९७ ते १३ मार्च, १९९८), सुजाता ठुकरूल (१४ मार्च, २००७ ते ७ जुलै, २००८), चेतना पारकर (२१ जुलै, २००८ ते २६ नोव्हेंबर, २००९), पल्लवी तळेकर (२७ नोव्हेंबर, २००९ ते १३ मार्च, २०१२), सोनम बावकर (१४ सप्टेंबर, २०१४ ते १३ मार्च, २०१७), प्रमिला कानडे (३ नोव्हेंबर, २०२१ ते ३० जून, २०२१), विशाखा लाड (३० डिसेंबर, २०१९ ते १९ ऑक्टोबर, २०२२), करूणा कदम (९ ऑगस्ट, २०२१ ते १३ मार्च, २०२२) यांचा समावेश आहे. आता जाहीर झालेल्या सोडतीने नवव्यांदा पंचायत समितीचे सभापतिपद महिलांसाठी आरक्षित झाले आहे.
चौकट
सभापतीनंतर जिल्हा परिषद अध्यक्षांचा दोघांना मान
राजापूर पंचायत समितीचे सभापतिपद भूषवल्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान तालुक्यातील दोन माजी सभापती पंचायत सभापतींना मिळाला आहे. त्यामध्ये (कै.) भिकाजीराव चव्हाण यांच्यासह प्रतिभा गुरव या एकमेव महिला सभापतींचा त्यामध्ये समावेश आहे.
चौकट
सभापती आरक्षणासाठीच्या गटाची उत्सुकता
पंचायत समितीच्या सभापतीपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली असली तरी, पंचायत समितीच्या गणांच्या आरक्षणाची सोडत अद्यापही झालेली नाही. त्यामध्ये पंचायत समितीच्या बारा गणांची आरक्षण सोडत १३ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामध्ये सभापतिपद आरक्षित असलेले नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या प्रवर्गासाठी कोणता गण आरक्षित होणार० याकडे लक्ष आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.