रत्नागिरी- देवीचे विसर्जन करून नवरात्रोत्सवाची सांगता
rat3p21.jpg-
96182
रत्नागिरी : विजयादशमीला पऱ्याची आळीतील सर्वांत उंच दुर्गामातेच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक लक्षवेधी ठरली.
rat3p22.jpg-
96183
रत्नागिरी : विक्रांत मित्रमंडळाच्या देवीच्या मिरवणुकीत जल्लोष करताना भाविक. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
-----------
दसऱ्यामुळे बाजारपेठेत खरेदीचा उत्साह
बाजारपेठेला झळाळी; देवींच्या विसर्जनाने नवरात्रोत्सवाची सांगता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : नवरात्रोत्सवाच्या सांगतेला पावसाने विश्रांती घेतल्याने दुर्गामातांच्या विसर्जनाच्या मिरवणुका जल्लोषात निघाल्या. गेले आठ-नऊ दिवस पावसामुळे रास गरबा खेळणाऱ्यांच्या उत्साहावर पाणी फेरले होते; परंतु काल विजयादशमीला पावसाने सुट्टी घेतली. बाजारपेठांमध्ये सोने खरेदीसह नवीन इलेक्ट्रिक वस्तू खरेदी, दुचाकी, चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली. यामुळे बाजारपेठेला नवी झळाळी मिळाली असून, कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यात सार्वजनिक देवी व घरोघरी दुर्गामाता प्रतिमा, कलशांचे पूजन नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी करण्यात आले. त्यानंतर दररोज विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, रास गरबा नृत्य कार्यक्रमांचे आयोजन विविध ठिकाणी केले. याला भाविकांचा प्रतिसाद मिळाला. काही वेळा पावसाने गरबा नृत्यावर पाणी फेरले.
जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये भाविकांची रिघ लागली. यामध्ये रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवी, आडिवरे येथील श्री महाकाली देवी, पावसची नवलादेवी, शिरगावची आदिष्टी, काजरघाटी येथील श्री महालक्ष्मी, चिपळूणची करंजेश्वरी, विंध्यवासिनी, गुहागरची दुर्गादेवी व जिल्ह्यात विविध देवी मंदिरांमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. भाविकांची सदैव वर्दळ होती.
विजयादशमीनिमित्त सायंकाळी सोने लुटून दुर्गादेवीच्या मिरवणुकांना प्रारंभ झाला. पाऊस नसल्यामुळे ढोलताशांचा गजर, डिजे तसेच बेन्जो अशा वाद्यांच्या गजरात मोठमोठ्या मिरवणुका पाहायला मिळाल्या. नद्यांसह समुद्रात या देवींचे विसर्जन करून सर्वांचे भले कर, अशी प्रार्थना करण्यात आली. मिरवणुकांसाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.
चौकट
दुर्गा दौडला उदंड प्रतिसाद
प्रतिवर्षाप्रमाणे रत्नागिरीत मारूती मंदिर शिवतीर्थ येथून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे धारकऱ्यांची श्री दुर्गामाता दौड घटस्थापना ते विजयादशमी या कालावधीत काढण्यात आली. दौडमध्ये भगव्या ध्वजाचे पूजन, सामुदायिक प्रार्थना, प्रेरणामंत्र म्हणत दररोज सार्वजनिक मंडळाच्या देवीचे दर्शनही घेण्यात आले. या दौडला भरपावसातही उदंड प्रतिसाद मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.