रत्नागिरी- समाजातील सज्ज शक्तीला सक्रिय करणार

रत्नागिरी- समाजातील सज्ज शक्तीला सक्रिय करणार

Published on

rat३p२६.jpg-
25N96412
रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात बोलताना कोकण प्रांत संघचालक बाबाजी चांदेकर. डावीकडून अॅड. विनय आंबुलकर, वैद्य महेंद्र पाध्ये. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
----
समाजातील सज्जन शक्तीला सक्रिय करणार
बाबा चांदेकर ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : समाजामध्ये ८० टक्के सज्जन व्यक्ती असून, त्यांच्या सज्जन शक्तीला समाजासाठी, राष्ट्रासाठी सक्रिय करण्याची आवश्यकता आहे. २०४७ चा भारत देश विश्वगुरू असणार आहे. त्याकरिता पंच परिवर्तनाद्वारे समाजजागृती केली जाणार आहे. यामध्ये कुटुंब संवाद, पर्यावरणाचे रक्षण, समरसतायुक्त समाज, ‘स्व’त्व जागृती आणि नागरी शिष्टाचाराचे पालन या मुद्द्यांच्या समावेश आहे. संघाकडून यावर वर्षभरात विशेष भर दिला जाणार आहे, असे प्रतिपादन कोकण प्रांत संघचालक अर्जुन तथा बाबाजी चांदेकर केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रत्नागिरी शहराचा विजयादशमी उत्सव स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहामध्ये साजरा झाला. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आशादीप संस्थेचे अध्यक्ष, श्रीमान भागोजीशेठ कीर ट्रस्टचे विश्वस्त अॅड. विनय आंबुलकर आणि नगर संघचालक वैद्य महेंद्र पाध्ये उपस्थित होते.
चांदेकर म्हणाले की, ‘व्यक्ती निर्माणातून राष्ट्रनिर्माण’ हा विचार घेऊन १९२५ ला विजयादशमीच्या मुहूर्तावर डॉ. केशव हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघाच्या कार्याला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने येत्या विजयादशमीपासून पुढील एक वर्ष ‘शताब्दी वर्ष’ म्हणून विविध कार्यक्रमांनी साजरे करण्याचे संघाने ठरवले आहे. पुढील वर्षभरात टप्प्याटप्प्याने व्यापक गृहसंपर्क अभियान, हिंदू संमेलन, सामाजिक सद्भाव बैठक, प्रमुख नागरिक संवाद, युवकांसाठी कार्यक्रम आणि शाखा सप्ताह असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. सुरुवातीला शस्त्रपूजन करण्यात आले. त्यानंतर संघांच्या नित्य शाखेतील दिनक्रम प्रत्यक्ष शाखा लावून दाखवले. नगर कार्यवाह माधव साळस्कर यांनी संघाच्या कार्याचा आढावा घेतला.

कोट
कोणतीही संस्था १०० वर्षे पूर्ण करते, त्यात बदल हा महत्त्वाचा घटक आहे. योग्य कार्यपद्धती अनुसरणे हे आवश्यक असते. यातून संस्था पुढे जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० वर्षे पूर्ण करून आता नव्या टप्प्यावर प्रवास करतोय. जुन्या कार्यकर्त्यांचे स्मरण करणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. १९२५ मध्ये शिरगावात दामले गुरुजींच्या घरी डॉ. हेडगेवार व वीर सावरकर यांची चर्चा झाली. त्यानंतर संघाची स्थापना झाली. रत्नागिरीशी निगडित ही गोष्ट अभिमानास्पद आहे.
- अॅड. विनय आंबुलकर.

Marathi News Esakal
www.esakal.com