युवासेना पदाधिकाऱ्यांच्या मालवणमध्ये नियुक्त्या
युवासेना पदाधिकाऱ्यांच्या
मालवणमध्ये नियुक्त्या
मालवण : आमदार नीलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी तालुक्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. मालवण कुडाळ युवासेना सहसचिव पदी अक्षय तावडे, जि.प. विभाग मसुरे, आचरा, आडवली-मालडी युवासेना तालुका सचिव पदी चिन्मय तांडेल, युवासेना मसुरे विभागप्रमुखपदी धनंजय परब, आचरा विभागप्रमुखपदी उमेश सावंत, आडवली-मालडी विभागप्रमुखपदी गितेश खेडेकर यांसह जि.प. विभाग देवबाग, पेंडूर, पोईप युवासेना तालुका संघटकपदी अमोल मुळीक, उपतालुकाप्रमुखपदी संदेश वेतुरेकर, तालुका सचिवपदी तथागत मालवणकर तर जि.प. सुकळवाड पोईप विभागप्रमुखपदी विशाल धुरी यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे दिली. शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, शिवसेना सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, सांस्कृतिक विभाग जिल्हाप्रमुख भालचंद्र केळूसकर, युवासेना विधानसभा प्रमुख प्रीतम गावडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मिहीर राणे, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, युवासेना तालुकाप्रमुख अभि लाड, संकेत राऊळ, संतोष साटविलकर, छोटू ठाकुर, पिंट्या गावकर, मकरंद राणे, मंदार लुडबे, बबन परब, संदीप भोजणे आदी उपस्थित होते.
----
‘निवृत्त सेवक’ची आज
मालवण येथे सभा
मालवण : मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची मासिक सभा रविवारी (ता.५) सायंकाळी ५ वाजता टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे होणार आहे, तरी सर्व सदस्यांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघांचे अध्यक्ष अजित गवंडे व सचिव दामोदर गवई यांनी केले आहे.