सावंतवाडीत पथनाट्यातून स्वच्छतेबाबत जनजागृती

सावंतवाडीत पथनाट्यातून
स्वच्छतेबाबत जनजागृती
Published on

96303

सावंतवाडीत पथनाट्यातून
स्वच्छतेबाबत जनजागृती

सावंतवाडी, ता. ४ ः यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन सावंतवाडी शहरात रॅली व पथनाट्याद्वारे जनजागृती केली. महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला. रॅलीची सुरुवात श्रीराम वाचन मंदिर येथून झाली. त्यानंतर बाजारपेठेतून फेरी काढत विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले. गांधी चौकात पोहोचून स्वच्छता व अहिंसेवर आधारित पथनाट्य सादर केले. घोषणाबाजी करत ‘गांधीजींचा स्वच्छतेचा संदेश आचरणात आणा,’ असे नागरिकांना आवाहन केले. यावेळी स्वच्छतेचा संदेश देणारी शमीची पाने तयार करून नागरिकांमध्ये वितरित करण्यात आली. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुमित पिरणकर यांनी वाहतूक व्यवस्थापन करून कार्यक्रम होण्यास मदत केली. बाजारपेठेतील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक, शिक्षकवर्ग, प्रीती डोंगरे, महादेवी मलगर, रसिका कंग्राळकर, महिमा चारी, ऋतुजा तुळसकर, प्राची परब, बाबू भुसारी, संदीप पेडणेकर, सचिन हरमलकर, अस्मिता परब, वैभवी बोवलेकर, महेश पालव, प्रकाश धुरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com