सिंधुदुर्गातील जलतरणपटूंची यशस्वी झेप
96388
सिंधुदुर्गातील जलतरणपटूंची यशस्वी झेप
जिल्हास्तरीय स्पर्धेत यश; कोल्हापूर येथील विभागीय स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ४ ः जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत येथील जलतरण तलावामध्ये सराव करणाऱ्या जलतरणपटूंनी उल्लेखनीय यश मिळविले. त्यांची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सांगली येथे ८ व ९ ऑक्टोबरला विभागीय स्पर्धा होणार आहे.
जिल्हा क्रीडा विभागामार्फत सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धा झाली. स्पर्धेत जिल्हाभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेत येथील जलतरण तलावात विविध शाळांमधून सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. निकाल असा ः १४ वर्षांखालील मुले-वेदांत फोपळे (वराडकर हायस्कूल कट्टा, मालवण)-४०० मीटर फ्रीस्टाईल १०० मीटर बॅकस्ट्रोक २०० मीटर बॅकस्ट्रोक या तिन्ही प्रकारांत प्रथम, अथर्व सावंत (डॉन बॉस्को स्कूल ओरोस)-५० मीटर १०० मीटर २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या तिन्ही प्रकारांत प्रथम, स्वराज सावंत (विद्यानिकेतन स्कूल कसाल)-५० मीटर, १०० मीटर २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या तिन्ही प्रकारांत द्वितीय, अथर्व पेडणेकर (डॉन बॉस्को स्कूल ओरोस) याने तिन्ही प्रकारांत तृतीय, आर्यन भिसे (जिल्हा परिषद शाळा सुकळवाड मालवण)- ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये तृतीय. साईराज गाड (डॉन बॉस्को स्कूल ओरोस) १०० व २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये तृतीय, ५० मीटरमध्ये द्वितीय. १४ वर्षांखालील मुली- स्वरा गावडे (श्री शिवाजी हायस्कूल पणदूर) हिने ४०० मीटर फ्रीस्टाइल, १०० मीटर बॅक स्ट्रोक, २०० मीटर बॅक स्ट्रोक या तिन्ही प्रकारांमध्ये प्रथम, स्वरा पालव (डॉन बॉस्को स्कूल ओरोस) हिने ५० मीटर, १०० मीटर, २०० मीटर बटरफ्लाय या तिन्ही प्रकारांमध्ये प्रथम, डेलिशा सावंत (एसएम हायस्कूल कणकवली) हिने ५० मीटर फ्रीस्टाइल या प्रकारात चतुर्थ क्रमांक, १७ वर्षांखालील मुले-मार्क डिसूजा (डॉन बॉस्को ओरोस) याने १०० मीटर बॅकस्ट्रोक व ४०० मीटर फ्री स्टाईल ८०० मीटर फ्रीस्टाईल या तिन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक, देवांशू वेंगुर्लेकर (डॉन बॉस्को स्कूल ओरोस)-५० मीटर, १०० मीटर, २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात प्रथम. गौरेश लाड (डॉन बॉस्को स्कूल ओरोस)-५० मीटर, १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये प्रथम, ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात द्वितीय. ओंकार कानशिडे (कुडाळ कॉलेज कुडाळ)-५० मीटर व १०० मीटर फ्रीस्टाइल या दोन्ही प्रकारात द्वितीय. १९ वर्षांखालील मुले-मानस बांदेलकर (डॉन बॉस्को स्कूल ओरोस)-४०० मीटर, १५०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात प्रथम, ५० मीटर बटरफ्लायमध्ये प्रथम. १९ वर्षांखालील मुली-तृप्ती दळवी (श्री शिवाजी हायस्कूल पणदूर)-५० मीटर, १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक व ५० मीटर फ्री स्टाईलमध्ये प्रथम.
---
पुढील स्पर्धेसाठी मान्यवरांकडून शुभेच्छा
सर्व स्पर्धकांना सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलावाचे कंत्राटदार व प्रशिक्षक प्रवीण सुलोकार यांचे प्रशिक्षण लाभले. जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, सहायक जिल्हा क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, सहायक जिल्हा क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे, सहायक जिल्हा क्रीडा अधिकारी शीतल शिंदे, माधुरी घराळ, क्रीडा मार्गदर्शक माधुरी घराळ यांनी शुभेच्छा दिल्या.