मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या
विद्यार्थ्यांचे नेमबाजीत यश

मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे नेमबाजीत यश

Published on

96389

मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या
विद्यार्थ्यांचे नेमबाजीत यश
सावंतवाडी, ता. ४ ः येथे झालेल्या नेमबाजी स्पर्धेत द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शमित लाखे याने पीप साईट रायफल शूटिंगमध्ये २०० पैकी १८१ गुण मिळवत सुवर्णपदक व चषक पटकावला. प्राची कांबळी हिने ओपन साइट रायफल शूटिंगमध्ये कांस्यपदक मिळवले. कुडाळ येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन महिला बुद्धिबळ स्पर्धेत कॉलेजच्या महिला संघाने उपविजेतेपद पटकावले. यात आर्या प्रभुदेसाई, सावनी जाधव, सानिका काळसेकर आणि अश्विनी भोगण या विद्यार्थिनींचा समावेश होता. बॅडमिंटन स्पर्धेत द्वितीय वर्ष कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमधील रुद्र शिरोडकर याच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्याची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली. सर्व विद्यार्थी मुंबईतील इंटर झोनल फेरीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना प्रा. एस. जी. केरकर, प्रा. पी. एस. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे कॉलेजचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, प्राचार्य डॉ.रमण बाणे यांनी अभिनंदन केले.

Marathi News Esakal
www.esakal.com