डॉ. दत्ता सामंत प्रशाला वाळूशिल्प स्पर्धेत प्रथम
96390
डॉ. दत्ता सामंत प्रशाला
वाळूशिल्प स्पर्धेत प्रथम
मालवण, ता. ४ : येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि किल्ले प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन सप्ताह २०२५ च्या निमित्ताने आयोजित किल्ले वाळूशिल्प स्पर्धेत डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूलच्या डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. मालवण चिवला बीच येथे ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत हायस्कूल गटात आठवी ते दहावीमध्ये देवबाग प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश प्राप्त केले. या स्पर्धेत प्रशालेचे चार विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये नववीतील मयुरेश चोडणेकर, समर्थ तांडेल, दहावीतील हितेश तुळसकर, पियुष आचरेकर यांचा समावेश होता. या चारही विद्यार्थ्यांना प्रशालेचे कलाशिक्षक वसंत मेस्त्री यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका रचना खोबरेकर आदींनी अभिनंदन केले.