सुकळवाड तंटामुक्ती सभेत जमीन वादाला पूर्णविराम
96391
सुकळवाड तंटामुक्ती सभेत
जमिन वादाला पूर्णविराम
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ४ : सुकळवाड ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित तंटामुक्त समितीच्या सभेत जमिनीच्या आर्थिक व्यवहारावरून सुरू असलेला पाच वर्षांचा जुना वाद यशस्वीरित्या तडजोडीने मिटवण्यात आला. समितीच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे दीर्घकाळ चाललेल्या वादाला पूर्णविराम मिळाला आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात काल (ता. ३) सकाळी ११ वाजता या सभेला सुरुवात झाली. तंटामुक्त समितीच्या सर्व सदस्यांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली. चर्चेअंती दोन्ही पक्षांमध्ये योग्य तडजोड घडून आणण्यात समितीला यश आले. या सभेस तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबुराव मसुरकर, समितीमधील सदस्य किशोर पेडणेकर, भाऊ पाताडे, स्वप्नील गावडे, शरद पाताडे, वृषाली गरुड, प्रमिला पाताडे, वैदेही मोरजकर, प्रसाद मोरजकर, समिती सचिव तथा पोलिस टील लक्ष्मण काळसेकर, सामाजिक कार्यकर्ते राजन पावसकर, ग्रामपंचायत अधिकारी वेदिका गोसावी आदी उपस्थित होते. समितीच्या कार्यपद्धतीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.