कोकण
वरचा कुंभारवाडा शाळेत दंत चिकित्सा
96433
वरचा कुंभारवाडा शाळेत दंत चिकित्सा
कुडाळ ः येथील सहयोगिनी महिला मंडळातर्फे वरची कुंभारवाडा जिल्हा परिषद शाळेमध्ये दंत चिकित्सा शिबिर घेण्यात आले. डॉ. सिद्धेश बांदेकर, डॉ. नेहा डांगी, डॉ. आकांक्षा जाधव यांनी मुलांची तपासणी केली. डॉ. बांदेकर यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी ५५ विद्यार्थ्यांची तपासणी केली. सहयोगिनी महिला मंडळातर्फे सर्व विद्यार्थ्यांना टूथब्रश व टूथपेस्टचे वाटप केले. अस्मिता बांदेकर, स्नेहांकिता माने, मेघा सुकी, नीता गोवेकर, राजश्री सावंत, प्रीती तायशेटे, सुजाता तेली, प्रशालेचे शिक्षक सहदेव घाडीगावकर, सुरभी शिरोडकर, श्रीमती शेवडे उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी नीता गोवेकर, अस्मिता बांदेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.